Passing Drugs In Prison With A Kiss: 'प्रेमात आणि युध्दात सर्व काही माफ असते', अशी सुभाषिते प्रेमी युगुलांसाठी तयार करण्यात आली आहेत असं वाटतं. प्रेम मग कुणावरही होतं, यामध्ये जात, धर्म, पथं, रंग, देश या सीमा गळून पडतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमी युगुल चुंबन घेतात, परंतु चुंबन घेतल्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? हे ऐकायला थोडसं तुम्हाला विचित्र वाटेल, पण खरं आहे.
दरम्यान, अमेरिकेतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका महिलेने एका पुरुषाची चुंबन घेऊन हत्या केली आहे. आता तिच्यावर खुनाचा खटला चालवला जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महिला तिच्या एका साथीदाराला भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचली होती.
ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू
'न्यूयॉर्क पोस्ट'च्या वृत्तानुसार, अमेरिकेतील (America) टेनेसी येथील 33 वर्षीय रॅचेल डॉलरर्डने (Rachel Dollard) कथितरित्या तोंडामध्ये मेथॅम्फेटामाइन हे ड्रग्ज लपवले होते. जेव्हा तिने तुरुंगात असलेल्या जोशुआ ब्राउनचे चुंबन घेतले तेव्हा हे ड्रग्ज त्याच्या तोंडात गेले. एवढेच नाही तर ब्राउनने हे संपूर्ण ड्रग्ज गिळले आणि अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला. ब्राउनच्या मृत्यूनंतर पोलिसांनी (Police) रेचेलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे.
कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे
टेनेसी डिपार्टमेंट ऑफ करेक्शनने सांगितले की, ब्राउन ड्रग्ज-संबंधित आरोपांवर 11 वर्षांची शिक्षा भोगत आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे त्याचा मृत्यू झाला. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेचेलवर ब्राउनच्या हत्येचा आरोप आहे. त्याच्यावर तुरुंगात अंमली पदार्थांची तस्करी केल्याचाही आरोप होता.
दुसरीकडे, या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल आणि दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे कारागृह प्रशासनाने म्हटले आहे. चौकशीदरम्यान, रेचेलने कबूल केले आहे की, मी यापूर्वी कारागृहात ब्राउनला ड्रग्जचा पुरवठा केला होता. 2017 मध्ये, ओरेगॉनच्या एका महिलेला अशाच एका गुन्ह्यासाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ज्यामध्ये तिच्या प्रियकराचा चुंबन घेतल्यानंतर मृत्यू झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.