कॅनेडामधील हिंदू मंदिरांची चोरट्यांकडून तोडफोड

मंदिरातील दानपेट्यांमधून रोख रक्कम चोरण्याबरोबरच मूर्तीवर सजवलेले दागिनेही चोरट्यांनी चोरून नेले.
Canada
CanadaDainik Gomantak

ग्रेटर टोरंटो एरियामधील मंदिराचे पुजारी आणि भविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण गेल्या दहा दिवसांत अनेक मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. मंदिरातील दानपेट्यांमधून रोख रक्कम चोरण्याबरोबरच मूर्तीवर सजवलेले दागिनेही चोरट्यानी चोरून नेले.

मंदिरांना (Temple) लक्ष्य करणाऱ्या या घटनांची सुरुवात 15 जानेवारी रोजी ब्रॅम्प्टनच्या GAT शहरातील श्री हनुमान मंदिराच्या अयशस्वी तोंडफोडीने झाली. तेव्हापासून चोरट्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. 25 जानेवारी रोजी, ब्रॅम्प्टनमधील आणखी एका मंदिराची, माँ चिंतापूर्णी मंदिराची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतरी हे हल्लेखोर शांत बसले नाहीत, त्यांनी गौरी शंकर मंदिर आणि जगन्नाथ मंदिर येथेही तोडफोड केली आहे. मिसिसॉगा येथील हिंदू हेरिटेज सेंटर आणि हॅमिल्टन समाज मंदिरातही त्यांनी अशाच घटना घडवून आणल्या. मिसिसॉगा येथील हिंदू हेरिटेज सेंटर येथे 30 जानेबवरी रोजी दोन पुरुषांनी केंद्रात घुसून दानपेट्यांची आणि मुख्य कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमुळे भाविक आणि पुजारी दुखावले आहेत असे मंदिराकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितले आहे.

Canada
'रशियन आक्रमण थांबवा' हजारो लोक युक्रेनच्या रस्त्यावर

मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा कॅमेरामध्ये (Camera) प्रतिमानुसार, या प्रत्येक ब्रेक-इनमद्धे दोन व्यक्ति सामील आहेत आणि या घटना दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान घडल्या मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली असून परीसराच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवकांनी रात्रीची गस्त सुरू केल्या आहेत. पोलिसांनी मंदिराभोवती (Temple) गस्त वाढवण्याचे आश्वासनही दिले आहे,असे निवेदनात म्हंटले आहे. मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या तोडफोडीमुळे समाजाला मोठा धक्का बसला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com