Russia: जूना मित्र सोडणार रशियाची साथ! अमेरिकेचे पारडे जड होणार?

Russia: अजरबैजानने जर अर्मानियावर हल्ला केला तर रशियाने मदतीचे आश्वासन दिले आहे.
Russia- Armenia
Russia- ArmeniaDainik Gomantak

Russia: जागतिक स्तरावर प्रत्येक देशाचे काही राष्ट्रे मित्र असतात, काही राष्ट्रे शत्रू असतात तर काही स्पर्धक असतात. हे संबंध प्रत्येक राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणामधून निश्चित होत असतात. आता रशियाचा सर्वात जूना मित्र अर्मानिया रशियाची साथ सोडत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

अर्मानियाने रशियाचे साथ सोडण्याचे कारण काय आहे?

रशियाने युक्रेनवर हल्ला हे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे. जेव्हापासून रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आहे तेव्हापासून अर्मानिया आणि रशिया यांच्या संबंधात दरी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ज्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाचे पंतप्रधान पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे त्या न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात सामील होण्याच्या दिशेने अर्मानिया पाऊले टाकत आहे. मात्र हा निर्णय घेतला तर अर्मानियाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

अर्मानियाने अशा निर्णयाचा विचार करण्याचे कारण म्हणजे अजरबैजानचे सैन्य अर्मानियाच्या सीमेजवळ पोहचले आहे. हे सैन्य आपल्या हत्यारावर विशिष्ट प्रकारचे निशान बनवत असल्याने अर्मानियावर युद्धहल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजरबैजानने जर अर्मानियावर हल्ला केला तर रशियाने मदतीचे आश्वासन दिले आहे.

अमेरिकेचे सैन्य पोहचले अर्मानियामध्ये

शांतिरक्षकच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेचे सैन्य अर्मानियामध्ये पोहचले. हे ट्रेनिंग १० दिवस चालणार असल्याचे म्हटले जात आहे. या प्रशिक्षणात अमेरिकेचे ८५ सैनिक आणि अर्मानियाचे १७५ सैनिक सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र यावरुन रशियाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आता अर्मानिया अमेरिकेच्या गटात जाणार अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Russia- Armenia
Anju Nasrullah Love Story: 3 महिन्यात उतरली प्रेमाची नशा, मुलांची आठवण आल्याने अंजू पाकिस्तानातून परतणार

दरम्यान, अमेरिकेने सरुवातीपासूनच रशिया-युक्रेन युद्धाला विरोध केला आहे. रशियाने हे युद्ध थांबवावे म्हणून व्यापाराबाबतच्या विविध अटी लावून रशियाला कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र रशियाने आपल्या भूमिकेवर ठाम राहत युक्रेनबरोबरचे हे युद्ध सुरुच ठेवले आहे.

जे आजही दीड वर्षानंतरही सुरुच आहे. आता अर्मानिया आणि रशियाची या युद्धामुळे इतक्या वर्षांची मैत्री तुटणार का ? अर्मानियामुळे अमेरिकेचे पारडे जड होणार का? रशिया यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com