पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या अणु प्रकल्पाजवळ मोठा स्फोट, डेरा गाझी खान हादरले

Dera Ghazi Khan: पाकिस्तानच्या डेरा गाझी खानमध्ये मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या अणु प्रकल्पाजवळ झाला.
Explosion
ExplosionDainik Gomantak

Dera Ghazi Khan: पाकिस्तानच्या डेरा गाझी खानमध्ये मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या अणु प्रकल्पाजवळ झाला. या स्फोटामागे ड्रोन हल्ला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल, रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहने पाठवण्यात आली आहेत. तालिबानने या आण्विक युनिटवर हल्ला करण्याच्या अनेक धमक्या दिल्या असताना हा स्फोट झाला आहे.

जिथे स्फोट झाला तिथे युरेनियम प्लांट देखील आहे. त्यामुळेच या संपूर्ण भागात पाकिस्तानी लष्कराने कडक बंदोबस्त ठेवला आहे.

कित्येक किलोमीटर दूरही जाणवले

वास्तविक, पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांताच्या दक्षिणेकडील डेरा गाझी खान जिल्ह्यात हा स्फोट झाला. पाकिस्तानचा अणु प्रकल्प येथे आहे.

पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, या स्फोटाचा प्रभाव घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरावर जाणवला. सध्या या स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही, मात्र तहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांनी हा अणु प्रकल्प उडवून देण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून हा अणु प्रकल्प अत्यंत सुरक्षेत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानने डेरा गाझीमध्येच युरेनियमचे भांडार आहे. तर डेरा गाझी खानमध्ये बनवलेले आण्विक केंद्र पाकिस्तानातील सर्वात मोठे आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

Explosion
Pakistan: पाकिस्तान लष्कराचा तालिबानच्या तळावर छापा, गोळीबारात 3 दहशतवादी ठार

अधिकृत वक्तव्य आलेले नाही

याशिवाय, स्फोटाच्या आसपासच्या लोकांना लवकरात लवकर रस्ते रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक धावतानाही दिसत आहेत.

पण सर्वात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे पाकिस्तान सरकारकडून (Government) याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही किंवा संबंधित विभागाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणी अधिक पुष्टी करणे कठीण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com