Viral News: तब्बल 11 हजार फूट उंचीवर उड्डाण करणाऱ्या विमानात वैमानिकाला अचानक कॉकपिटमध्ये विषारी कोब्राचे दर्शन झाले. अत्यंत विषारी प्रजातीचा हा साप कॉकपिटमध्येच होता. सापाला पाहून वैमानिक क्षणभर घाबरले, पण नंतर त्यांनी शांततेने निर्णय घेऊन विमानातील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. दक्षिण आफ्रिकेतील ही घटना आहे.
पायलट रुडॉल्फ इरास्मस, जो वॉर्सेस्टर ते नेल्स्प्रूट विमान उडवत होता, त्याला त्याच्या सीटखाली काहीतरी थंड जाणवू लागले. पाण्याची बाटली लीक झाली असे पायलटला वाटले. दरम्यान, त्याने निरखून पाहिले असता, त्याला विषारी कोब्रा साप सीटवरून खाली पळताना दिसला. या सापाची लांबी सुमारे 5 फूट होती.
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी विमान 11 हजार फूट उंचीवर होते. सापाची माहिती प्रवाशांना दिली तर विमानात एकच खळबळ उडेल या चिंतेने पायलट इरास्मस घाबरले. दरम्यान, यावेळी विमानात पायलटसह एकूण 5 लोक उपस्थित होते. तीन प्रवासी मागे बसले होते तर एक पायलटच्या शेजारी बसला होता.
पायलटने शांतपणे प्रवाशांना सांगितले की कॉकपिटमध्ये त्यांच्या सीटखाली साप आहे. त्यामुळे विमान लवकरात लवकर खाली उतरवावे लागेल. सुदैवाने विमानातील एकाही प्रवाशाने कोणताही आवाज केला नाही आणि विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
कॉकपिटमध्ये दिसणारा केप कोब्रा प्रजातीचा साप अत्यंत विषारी मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, या प्रजातीचा साप एखाद्याला चावला तर एका तासापेक्षा कमी कालावधीत व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्याला आफ्रिकेतील सर्वात धोकादायक कोब्रा म्हटले जाते.
विमानात कोब्रा दिसताच पायलटने जवळच्या विमानतळाशी संपर्क साधला आणि विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याची परवानगी मागितली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विमानतळ प्राधिकरणाने विमान उतरवण्याची परवानगीही दिली. या सुरक्षित लँडिंगसाठी दक्षिण आफ्रिकेचे नागरी विमान वाहतूक आयुक्त पॉपी खोजा यांनी इरास्मसच्या हवाई कौशल्याची प्रशंसा केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.