Israel-Hamas War: PM मोदींनी पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद; हॉस्पिटलवरील हल्ल्याबद्दल व्यक्त केला शोक!

PM Modi Speak To Mahmoud Abbas: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील काही दिवसांपासून युद्ध सुरु आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi Speak To Mahmoud Abbas: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील काही दिवसांपासून युद्ध सुरु आहे. यातच आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी बोलून गाझामधील रुग्णालयावरील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.

वास्तविक, इस्रायलवर हमासच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायली सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे. या युद्धात अतापर्यंत शेकडो निष्पाप पॅलेस्टिनीही मारले गेले आहेत, ज्यांना हमासचे दहशतवादी आजपर्यंत ढाल म्हणून वापरुन स्वतःचे रक्षण करत आहेत.

हमासने दाखवलेल्या क्रूरतेनंतर इस्रायल आपले हल्ले थांबवायला तयार नाहीये. अशा परिस्थितीत मानवतावादी मदतीच्या नावाखाली भारताने मोठे मन दाखवून पॅलेस्टाईनला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

'स्टँडमध्ये बदल नाही, मदत करत राहणार'

पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी गाझा येथील अल अहली रुग्णालयावरील हल्ल्यात स्थानिक नागरिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

सोशल मीडियावर त्यांच्या संभाषणाची माहिती देताना पीएम मोदींनी लिहिले की, ''आम्ही पॅलेस्टाईनच्या नागरिकांसाठी मानवतावादी मदत पाठवत राहू.

या चर्चेदरम्यान, आम्ही या प्रदेशातील दहशतवाद (Terrorism), हिंसाचार आणि ढासळत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारत आपल्या दीर्घकालीन तत्त्वनिष्ठ भूमिकेवर ठाम आहे. आम्ही पॅलेस्टाईनला मानवतावादी मदत देत राहू.''

रुग्णालयावरील हल्ल्याचे दोषी कोण?

गाझामधील रुग्णालयात (Hospital) निष्पापांच्या मृत्यूमुळे जगभरात संताप व्यक्त होत आहे. इस्रायलकडून रुग्णालयाला लक्ष्य करण्यात आल्याचे हमासचे म्हणणे आहे. दुसरीकडे, इस्रायलने या हल्ल्यात आपला हात असल्याचे नाकारले आहे.

इस्रायलची बदनामी करण्यासाठी हा हल्ला हमासनेच केला असल्याचा संशय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com