पाकिस्ताननंतर श्रीलंकेत पेट्रोल डिझेलच्या किमतीचा भडका

श्रीलंकन जनतेला मोठा झटका देत श्रीलंकेने (Sri Lanka) पेट्रोलच्या दरात 20 रुपयांनी वाढ केली आहे.
Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak
Published on
Updated on

Petrol Price Hike: रशियाने (Russia) युक्रेनवर केलेल्या हल्ल्यादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 वर पोहोचल्या आहेत, ही सात वर्षांतील कच्च्या तेलाची विक्रमी पातळी आहे. त्यामुळे भारत, पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका या देशांवरही किमती वाढवण्याचा दबाव आहे. शनिवारी श्रीलंकन जनतेला मोठा झटका देत श्रीलंकेने (Sri Lanka) पेट्रोलच्या दरात 20 रुपयांनी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने ही वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. लंका इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने महिनाभरात दुसऱ्यांदा ही वाढ केली आहे. श्रीलंकेतही डिझेल (Diesel) 15 रुपयांनी महागले आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्ताननेही पेट्रोलचे दर 12.30 रुपयांनी तर डिझेलचे दर 9.5 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. (Petrol And Diesel Prices Hiked By Rs 20 In Sri Lanka After Pakistan)

दरम्यान, पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर 159.86 रुपये प्रति लिटर आणि हायस्पीड डिझेलचा दर 147.83 रुपये प्रति लिटर झाला आहे. सोमवारपासून पेट्रोलचा दर 9.60 रुपये आणि डिझेलचा दर 8.50 रुपयांनी वाढू शकतो. आता श्रीलंकेत पेट्रोलचा दर 204 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 139 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. दुसरीकडे भारतात सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 86.67 रुपये आहे.

Sri Lanka
Petrol Diesel Price: जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर

तसेच, श्रीलंकेतील ही वाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे (Basil Rajapakse) यांचा भारत दौरा आणखी लांबणार असल्याचे दिसत आहे. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी श्रीलंका भारताकडे (India) अधिक मदत मागत आहे. बेसिल हे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे धाकटे भाऊ आहेत. मात्र, तारखा निश्चित करण्यात अडचणी येत असल्याने प्रवास लांबणीवर पडत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. भारताकडून एक अब्ज डॉलर्सचे कर्ज, खाद्यपदार्थ आणि औषधे आयात करण्यासाठी श्रीलंकेच्या मंत्र्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Sri Lanka
Petrol-Diesel दर वाढणार का? पहा पेट्रोलियम मंत्री काय म्हणाले...

शिवाय, या एक अब्ज डॉलरच्या मदतीमध्ये, $400 दशलक्ष चलन व्यवहाराच्या रुपात आहे. यामुळे श्रीलंकेला परकीय चलनाचा साठा वाढण्यास मदत होईल. श्रीलंका सरकारने गेल्या आठवड्यात कबूल केले होते की, कच्च्या तेलाची आयात करण्यासाठी पुरेशा परकीय चलन साठा नाही. त्यामुळे पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा संभवत आहे. श्रीलंकेत अन्न आणि औषधांचेही संकट आहे. त्यामुळे महागाईने मागील विक्रमी 25 टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. परकीय उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत मानल्या जाणाऱ्या श्रीलंकेच्या पर्यटन उद्योगावर कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांत वाईट परिणाम झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com