Abdul Basit Controversial Statement: ‘’कर्तारपूर साहिबच्या बदल्यात काश्मीर द्या, अन्यथा...’’; पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त बरळले!

Abdul Basit: पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन राजकीय तापमानाचा पारा वाढवला ​​आहे.
Abdul Basit Controversial Statement
Abdul Basit Controversial StatementDainik Gomantak
Published on
Updated on

Abdul Basit Controversial Statement: पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहेत. दरम्यान, काश्मीर प्रश्न धगधगत ठेवण्यासाठी पाकिस्तान सातत्याने गरळ ओकतो. कधी राजकीय नेते तर कधी सरकारी नोकरदार काश्मीर प्रश्नावरुन भारताला निशाणा बनवतात. यातच आता एका अधिकाऱ्याच्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीरबाबत वक्तव्य करुन तणावाची परिस्थिती निर्माण केली आहे. पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन राजकीय तापमानाचा पारा वाढवला ​​आहे.

अब्दुल बासित म्हणाले की, ‘’जर भारताला पाकिस्तानमधील शिखांची पवित्र तीर्थस्थळे हवी असतील, विशेषत: कर्तारपूर साहिब, तर त्यांनी जम्मू-काश्मीरवरचा ताबा सोडावा. जर जम्मू-काश्मीरऐवजी कर्तारपूर कॉरिडॉरची मागणी केली असती तर शिखांना त्यांच्या पवित्र तीर्थक्षेत्रांवर ताबा मिळू शकला असता. शीख धर्मीय लोकही वेगळा ‘खलिस्तान’ बनवू शकतात. शिवाय, भारतापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते पाकिस्तानमध्ये विलीनही होऊ शकतात.’’

Abdul Basit Controversial Statement
India Pakistan Tension: 'पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करु', राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर चवताळला पाकिस्तान; म्हणाला...

शीखांनी खलिस्तानी चळवळ पुनरुज्जीवित करावी

दरम्यान, पाकिस्तानी प्रसारमाध्यमातील एका चर्चेदरम्यान बासित यांनी अकलेचे तारे तोडले. बासित म्हणाले की, ‘’भारतातील शिखांचा असा विश्वास आहे की त्यांचे पवित्र मंदिर आणि पाकिस्तानमधील कर्तारपूर साहिब हे भारताचा भाग असले पाहिजेत परंतु आता असे होऊ शकत नाही. कर्तारपूर कॉरिडॉर भारताला देऊ आणि त्याबदल्यात संपूर्ण जम्मू-काश्मीर मिळवू, असा तोडगा कोणी काढला तर त्यावर भविष्यात याचा विचार करु शकतो. दुसरा मार्ग असा आहे की, शीखांनी आपली खलिस्तान चळवळ पुनरुज्जीवित करावी. जेव्हा त्यांना भारतापासून स्वातंत्र्य मिळेल तेव्हा ते पाकिस्तानचा भाग बनू शकतात.’’

पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर वातावरणं तापलं

अब्दुल बासित यांचे हे वादग्रस्त वक्तव्य पंतप्रधान मोदींनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यानंतर आले आहे. मोदी म्हणाले की, ‘’जर ते 1971 मध्ये सत्तेत असते तर त्यांनी आपल्या सैनिकांना मुक्त करण्यापूर्वी कर्तारपूर साहिब पाकिस्तानकडून घेतले असते.’’

दरम्यान, 23 मे रोजी पंजाबमधील पटियाला येथे एका रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींनी कर्तारपूर साहिबचा उल्लेख केला होता. कर्तारपूर साहिब हे शिखांचे सर्वात पवित्र ठिकाण आहे, जिथे गुरु नानक देव यांनी त्यांची शेवटची काही वर्षे घालवली होती. पंतप्रधान मोदींनी देशाच्या विभाजनासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आणि राष्ट्रीय एकात्मतेपेक्षा सत्तेला प्राधान्य दिल्याचा आरोप केला. मोदी म्हणाले की, 70 वर्षांपासून आपण कर्तारपूर साहिब गुरुद्वारा केवळ दुर्बिणीतूनच पाहतो. त्यावेळी, ते असते तर त्यांनी कर्तापूर साहिब पाकिस्तानकडून घेतले असते.

Abdul Basit Controversial Statement
India Pakistan Trade: पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला भारत देणार आधार? व्यापारासंबंधी शाहबाज सरकामधील मंत्र्याचं मोठं वक्तव्य

2019 मध्ये कर्तापूर साहिब कॉरिडॉरच्या उद्घाटनाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने यासंबंधी काहीही केले नाही, परंतु माझ्याकडून जेवढे शक्य होते तेवढे मी केले. शीख यात्रेकरुंचे कर्तारपूर साहिबला जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com