Pakistan News: पाकिस्तान पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (CTD) गुरुवारी या महिन्याच्या सुरुवातीला सुरक्षा दलांवर (डेरा इस्माईल खान हल्ला) झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि त्याच्या सात साथीदारांसह नऊ दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. यातील सहा दहशतवादी अफगाणिस्तानातील आहेत. त्याचवेळी, मास्टरमाइंड डीआय खानच्या दरबन भागातील रहिवासी आहे.
जिओ न्यूजनुसार, सीटीडीने सांगितले की, हा आत्मघाती हल्ला करणारा दहशतवादी हसन उर्फ शाकीर हा अफगाणिस्तानचा रहिवासी आहे. हल्ल्यापूर्वी त्याने एक व्हिडिओही जारी केला होता. या हल्ल्यात आत्मघाती हल्लेखोर सिफत उल्लाह मारवत ठार झाला होता. जिओ न्यूजने त्याचे राष्ट्रीय ओळखपत्र आणि रहिवासी पत्त्यासह अनेक कागदपत्रे मिळवली आहेत. तो अफगाणिस्तानचा रहिवासी असल्याचे या कागदपत्रांवरुन दिसून येते. त्याचवेळी, आत्मघातकी हल्लेखोराचे वडील सिफत उल्लाह यांनीही आपल्या मुलाचे या हल्ल्याशी कनेक्शन असल्याचे सांगितले.
मिळालेल्या कागदपत्रांनुसार, या हल्ल्यात प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) गंडापूर गटाचे पाच दहशतवादीही सामील होते. या दहशतवाद्यांकडून अमेरिकेत बनवलेले शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबरच्या पहाटे सहा आत्मघाती हल्लेखोरांनी डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील अशांत दरबान भागातील लष्करी छावणीमध्ये स्फोटकांनी भरलेला ट्रक घुसवला होता. यामध्ये 23 जवान शहीद झाले, तर अनेकजण जखमी झाले. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या चौकीवरही हल्ला केला. त्यांना चौकीत प्रवेश करायचा होता, पण त्यांचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. शेवटी, हताश होऊन, त्यांनी स्फोटकांनी भरलेला ट्रक चौकीमध्ये घुसवला.
तहरीक-ए-जिहाद-ए-पाकिस्तानने (टीजेपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा तहरीक-ए-तालिबान (TTP) शी संलग्न दहशतवादी गट आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.