Namibian President Hage Geingob Dies
Namibian President Hage Geingob DiesDainik Gomantak

Namibian President Hage Geingob: नामिबियाचे राष्ट्रपती हेज गिंगोब यांचे कर्करोगाने निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Namibian President Hage Geingob Dies: नामिबियाचे राष्ट्रपती हेज गिंगोब यांचे रविवारी निधन झाले. नामिबियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे.

Namibian President Hage Geingob Dies: नामिबियाचे राष्ट्रपती हेज गिंगोब यांचे रविवारी निधन झाले. नामिबियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे. राष्ट्रपती हेज गिंगोब यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. असे सांगितले जात आहे की, काही दिवसांपूर्वीच त्यांना कर्करोगाने ग्रस्त असल्याचे समजले होते. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप कोणीही उघड केलेले नाही.

नामिबियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने एक निवेदन जारी केले की, राष्ट्रपती हेज गिंगोब यांच्यावर विंडहोक येथील लेडी पोहंबा रुग्णालयात उपचार सुरु होते, जिथे त्यांचे आज निधन झाले. मात्र, राष्ट्रपती कार्यालयाने त्यांच्या मृत्यूचे कारण उघड केले नाही. नुकतेच राष्ट्रपती हेज गिंगोब यांना कर्करोगाची माहिती मिळाली होती, ज्यासाठी त्यांच्यावर उपचारही सुरु होते.

Namibian President Hage Geingob Dies
Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धात मुलांचे जीवन उद्ध्वस्त, 17 हजार अनाथ; 12000 मरण पावले

हेज गिंगोब यांच्यावर उपचार सुरु होते

गेल्या महिन्यात जानेवारीत राष्ट्रपती कार्यालयाने एक निवेदन जारी केले होते की, हेज गिंगोब यांना कर्करोग आहे आणि ते त्याच्या उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहेत. मात्र तिथेही त्यांचे काम चालू ठेवतील. दरम्यान, त्यांच्या निधनाची दु:खद बातमी समोर आली. काळजीवाहू राष्ट्रपती नांगोलो म्बुम्बा यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हेज गिंगोब हे नामिबियाचे पंतप्रधान राहिले आहेत

हेज गिंगोब हे नामिबियाचे पंतप्रधानही राहिले आहेत. या पदावर त्यांनी 12 वर्षे काम केले. यानंतर 2014 मध्ये ते नामिबियाचे तिसरे राष्ट्रपती बनले. गेल्या अनेक वर्षांपासून हेज गिंगोब यांची प्रकृती ठीक नव्हती. 2013 मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि आता त्यांना कर्करोग झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com