Singapore News: सिंगापूरने बुधवारी फाशीच्या शिक्षेसाठी आंतरराष्ट्रीय अपीलांकडे दुर्लक्ष करुन एक किलो गांजाची तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला फाशी दिली.
लीलावती सुपिया यांनी सीएनएनला सांगितले की, तिचा भाऊ तंगराजू सुपिया, 46, याला बुधवारी पहाटे चांगी तुरुंगात फाशी देण्यात आली. त्यानंतर कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले.
सेंट्रल नार्कोटिक्स ब्युरो (CNB) च्या निवेदनानुसार, 'एक किलोग्रामपेक्षा जास्त गांजाच्या (1,017.9 ग्रॅम) तस्करीला प्रोत्साहन दिल्याबद्दल तंगराजूला 2018 मध्ये पहिल्यांदा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सिंगापूरमध्ये (Singapore) गांजाची तस्करी करताना पकडले गेलेल्या दोन अन्य लोकांशी तो फोनवर बोलत असल्याचे न्यायालयाला आढळले.
CNB ने म्हटले आहे की, त्याच्या दोषी आणि फाशीच्या शिक्षेविरुद्धचे पूर्वीचे अपील 2019 मध्ये न्यायालयांनी फेटाळले होते. तसेच, राष्ट्रपती क्षमा याचिका देखील अयशस्वी झाल्या होत्या.
सिंगापूरमध्ये कठोर ड्रग्जविरोधी कायदे आहेत. सरकारचे म्हणणे आहे की, मृत्युदंडाची शिक्षा ही अंमली पदार्थांच्या तस्करांना रोखण्यासाठी प्रभावी मार्ग आहे.
दुसरीकडे, सिंगापूरच्या सर्वात जवळच्या शेजारी मलेशियाने (Malaysia) या महिन्याच्या सुरुवातीला अनिवार्य फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी व्यापक कायदेशीर सुधारणा केल्या आहेत.
'तुरुंगात राहूनही, त्याला त्याच्या निर्दोषतेसाठी लढायचे होते,' तंगराजूची बहीण लीलावती यांनी सीएनएनला सांगितले. तसेच, त्याला फाशीची देण्यापूर्वी लिलावती यांनी आपल्या भावासोबतची एक आठवण देखील यावेळी सांगितली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.