UN च्या सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओंमध्ये जयशंकर यांचे भाषण, काय म्हणाले होते भारताचे परराष्ट्र मंत्री?

Foreign Minister S Jaishankar Speech At UNGA: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ओळखले जातात.
Indian Foreign Minister S Jaishankar
Indian Foreign Minister S JaishankarDainik Gomantak
Published on
Updated on

Foreign Minister S Jaishankar Speech At UNGA: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ओळखले जातात. जयशंकर यांच्यासारखा परदेशी व्यासपीठावर अचूक उत्तरे देण्यासाठी प्रसिद्ध असलेला भारताचा क्वचितच परराष्ट्र मंत्री असेल. परदेशी प्रसारमाध्यमांनी त्यांना अनेकदा वादग्रस्त मुद्द्यांवर प्रश्न विचारले, पण त्यांनी आपल्या उत्तरांनी जगाला गप्प केले होते. 2023 मध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रात दिलेल्या भाषणाची बरीच चर्चा झाली होती. एस जयशंकर यांनी सप्टेंबर 2023 मध्ये हे भाषण दिले होते. 26 सप्टेंबर रोजी 78 व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी हे भाषण केले होते. UN मध्ये दिलेले जयशंकर यांचे 'वर्ल्ड फ्रेंड' भाषण यूएनच्या सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओंमध्ये समाविष्ट होते.

काय म्हणाले होते जयशंकर?

युनायटेड नेशन्सने आपल्या सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओंची यादी तयार केली आहे. या यादीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे भाषण आठव्या क्रमांकावर होते. या भाषणात ते म्हणाले होते की, असंलग्नतेच्या युगापासून आपण ‘विश्व मित्र’ म्हणजेच जगाच्या मित्राच्या युगात आलो आहोत. यूएनजीएमध्ये परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले होते की, आपण वॅक्सीन वर्णभेदासारखा अन्याय पुन्हा होऊ देऊ नये. हवामान कृती देखील ऐतिहासिक जबाबदारीपासून दूर जाऊ शकत नाही.

Indian Foreign Minister S Jaishankar
United Nations चा शिक्का असलेल्या लेटरहेडसह कचरावेचकाला सापडले 25 कोटी रुपये

भाषणात विशेष काय होते?

आपल्या भाषणात त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकत्र लढण्याचे आवाहन केले होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नमस्ते भारतापासून केली आणि ‘इंडिया दॅट इज भारत’ म्हणत भाषण संपवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) सहभागी न झाल्यामुळे, एस जयशंकर यांनी तिथे भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com