Sri Lanka: श्रीलंकेतून चीनचा पत्ता होणार कट! भारताने केली मोठी तयारी; धोरण घ्या समजून

Sri Lanka Financial Crisis: या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा श्रीलंका सात दशकांतील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाशी झुंजत होता, तेव्हा भारत मदतीसाठी आला होता.
Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak
Published on
Updated on

Sri Lanka Financial Crisis: या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा श्रीलंका सात दशकांतील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाशी झुंजत होता, तेव्हा भारत मदतीसाठी आला होता. या संकटाच्या काळात श्रीलंकेने इंधन, अन्न आणि औषधांची तीव्र टंचाई पाहिली. तर दुसरीकडे, भारताने जानेवारी ते जुलै दरम्यान सुमारे $4 अब्ज डॉलर्सची अत्यंत आवश्यक मदत दिली, ज्यात क्रेडिट लाइन, करन्सी स्वॅप यांचा समावेश आहे. भारताने श्रीलंकेतील 22 दशलक्ष लोकांसाठी आवश्यक औषधांनी भरलेली युद्धनौकाही पाठवली होती.

आता, श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून $2.9 अब्ज कर्ज मिळवले असून सध्या अर्थव्यवस्था स्थिर झाली आहे. तथापि, सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या श्रीलंकेत भारत (India) आपला स्टेक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत आपला प्रादेशिक प्रतिस्पर्धी चीनच्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी श्रीलंकेत दीर्घकालीन महत्त्वाकांक्षी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारचे मंत्री आणि तीन सूत्रांनी ही माहिती दिली.

Sri Lanka
Sri Lanka: श्रीलंकेतील अल्पसंख्याक तमिळांबाबत ' हा ' निर्णय घेण्यासाठी भारताचा दबाव

तर, श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी या महिन्यात एका मुलाखतीत सांगितले की, "सध्या आम्ही भारताकडून होत असलेल्या गुंतवणुकीकडे लक्ष देत आहोत. सध्या $1 बिलियन पेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प चर्चेत आहेत, जे श्रीलंकेत भारताची उपस्थिती मजबूत करण्यास मदत करतील.'' ते पुढे म्हणाले की, "ते (भारत) शक्य तितकी गुंतवणूक करण्यास तयार आहेत." "भारत कदाचित सुरक्षेच्या कारणास्तव गुंतवणुकीचा धोरणात्मक विचार करत आहे," असेही साबरी म्हणाले. दुसरीकडे, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने श्रीलंकेतील त्यांच्या योजना आणि धोरणात्मक उद्दिष्टांवर रॉयटर्सच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही.

Sri Lanka
Sri Lanka Financial Crisis: श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि भारताची भूमिका

श्रीलंकेला मदत करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे

उत्तर श्रीलंका भारतीय सीमेच्या निकट आहे. भारताने येथे प्रकल्प सुरु केल्यास चीनला तगडी टक्कर देण्यास मदत होऊ शकते. चीनने या दिशेने मोठी गुंतवणूक केली आहे. श्रीलंकेचा तामिळ बहुसंख्य उत्तर-दक्षिण प्रदेश देखील तामिळनाडूशी वांशिक संबंध सामायिक करतो. या वर्षी श्रीलंकेला मदत करणारा भारत सर्वात मोठा देश होता.

Sri Lanka
Sri Lanka Amendment: श्रीलंकेत संसदेला मिळणार राष्ट्राध्यक्षांपेक्षा जास्त अधिकार

अशा परिस्थितीत, ताज्या चर्चेतून चीनचा वाढता प्रभाव कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब दिसते. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्याचे एक कारण म्हणजे हे बेट आशियाला युरोपशी जोडणाऱ्या व्यस्त जलमार्गापासून थोड्याच अंतरावर आहे. अशा स्थितीत भारताला त्या बाजूने आपला प्रभाव कायम ठेवायचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com