Delta Airlines Incident: 'तू खूप सुंदर आहेस...', म्हणत मद्यधुंद प्रवाशाचं किळसवाणं कृत्य, विमानात नेमकं काय घडलं?

विमानातील एका वृद्ध प्रवाशाने पुरुष कर्मचाऱ्याचे जबरदस्तीने चुंबन घेतले.
Delta Airlines
Delta AirlinesDainik Gomantak
Published on
Updated on

Drunk Passenger on Delta Flight Kisses Flight Attendant: अनेक दिवसांपासुन विमानात मद्यधुंद अवस्थेतील गैरवर्तनाच्या बातम्या समोर येत आहेत. अलिकडेच विमानातील अशीच आणखी एक घटना पुन्हा समोर आली आहे.

डेल्टा एअरलाईन्सच्या विमानात एका प्रवाशाने पुरुष अटेंडंटचे जबरदस्तीने चुंबन घेतले आहे. अमेरिकेतील मिनेसोटा शहरातून अलास्काला जाणाऱ्या विमानात 61 वर्षीय व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत एका पुरुष केबिन क्रूला जबरदस्ती चुंबन घेतले.

अमेरिकन न्यूज पेपर द न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार, डेव्हिड अॅलन बर्क नावाचा प्रवासी 10 एप्रिलला मिनेसोटाहूनअलास्काला जात होता. डेव्हिड अॅलन बर्क हा बिझनेस फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत होता.

फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत असल्याने कोणत्याही प्रवाशाला मद्यपान करण्याची परवानगी आहे. विमानाचे स्वतःचे काही नियम होते, ज्यामुळे त्याला जास्त मद्यपान करण्याची परवानगी नव्हती.

  • केबिन क्रूच्या मानेवर घेतले चुंबन

विमान प्रवासादरम्यान वृद्ध व्यक्तीला जास्त दारु पिण्यास मनाई करण्यात आली, ज्यामुळे तो संतापला. त्यानंतर विमानातील पुरुष केबिन क्रू त्याच्याकडे काही हवे नको ते विचारण्यासाठी आला, त्यावेळी वृद्ध प्रवाशाने केबिन क्रूसोबत गैरवर्तन केले.

वृद्ध प्रवासी विमानाच्या मधल्या मोकळ्या जागेत उभा राहिला आणि केबिन क्रूला थांबवले. प्रवासी डेव्हिड बर्कने केबिन क्रूचे चुंबन घेण्यापूर्वी त्याचे कौतुक देखील केले होते

प्रवाशाने पुरुष केबिन क्रूला त्याचे चुंबन घेऊ देण्याची विनंती केली, पण केबिन क्रूने त्याला नकार दिला. त्यानंतर डेव्हिड अॅलन बर्कने केबिन क्रूला पकडले, त्याला आपल्याकडे खेचले आणि त्याच्या मानेवर चुंबन घेतले.

Delta Airlines
POK EID Accident: गिलगिट बाल्टिस्तानमध्ये ईद साजरी करणाऱ्या मुलांना कारने चिरडले; 3 ठार, 3 जखमी
  • एफबीआय अधिकाऱ्यांनी केली चौकशी

चुंबन घेताना प्रवासी डेव्हिड बर्कने ट्रेमध्ये ठेवलेले अन्नही खराब केले. या घटनेनंतर फ्लाईट अटेंडंट केबिन क्रू रुममध्ये गेला.

विमान अलास्का विमानतळावर उतरल्यानंतर वैमानिकाने विमानात घडलेल्या घटनेची संपुर्ण माहिती दिली. यानंतर एफबीआयचे अधिकारी आरोपींची चौकशी करण्यासाठी दाखल झाले.

चौकशी दरम्यान आरोपीने कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे. पण या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रवासी डेव्हिड बर्क यांना प्राणघातक हल्ला आणि गुन्हेगारी गैरवर्तनाच्या आरोपाखाली 27 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com