Viral Video: 68 वर्षांच्या ड्रग स्मग्लरवर चोरीचा आरोप; हात-पाय बांधून समुद्रात फेकले

या वृद्धाला 17 जुलै रोजी अज्ञात ठिकाणी कार्टेलच्या बैठकीत उपस्थित राहण्याचे आमिष दाखवण्यात आले. येथे पोहोचल्यानंतर त्याचे अपहरण करून समुद्रात फेकण्यात आले.
68-year-old Drug Smuggler Thrown Into The Sea For Theft Of Cocaine.
68-year-old Drug Smuggler Thrown Into The Sea For Theft Of Cocaine.Dainik Gomantak

68-year-old Drug Smuggler Thrown Into The Caribbean Sea For Theft Of Cocaine:

चोरीच्या आरोपावरून एका 68 वर्षीय वृद्धाला हात-पाय व तोंड बांधून समुद्रात फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्धाला समुद्रात टाकण्यापूर्वी त्याला मारहाणही करण्यात आली.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे की नाही याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती मिळालेली नाही. ही घटना 17 जुलै रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

'डेली मेल'च्या वृत्तानुसार, ही घटना कॅरेबियन समुद्रात घडली आहे. या 68 वर्षीय व्यक्तीचे नाव रेनाल्डो फुएन्टेस असे असून, तो व्हेनेझुएलाचा ड्रग डीलर होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, रेनाल्डो फ्युएन्टेसवर कोकेनची डिलिव्हरी चोरल्याचा आरोप आहे. यानंतर कोकेन डिलिव्हरीशी संबंधीत काहींनी रेनाल्डो फुएन्टेसचे अपहरण केले आणि त्याला एका जहाजात बसवून कॅरेबियन समुद्रात नेले. येथे त्याला आधी मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्याचे हात-पाय व तोंड बांधून त्याला समुद्रात फेकण्यात आले.

68-year-old Drug Smuggler Thrown Into The Sea For Theft Of Cocaine.
ब्लॅकमेल करत 45 महिलांवर बलात्कार, महिला शिक्षिकेच्या साथीने मुख्याध्यापकाचा विकृत प्रकार

व्हिडीओमध्ये रेनाल्डो फ्युएन्टेस घाबरलेला दिसत आहे. पाण्यात टाकल्यानंतर तो समुद्रात वाचवण्यासाठी विनवणी करताना दिसत आहे. त्याच्या अपहरणकर्त्यांची ओळख पटलेली अजूनही नाही.

हा व्हिडिओ बनवणारा व्यक्ती आरोपींना त्यांचा चेहरा झाकण्यास सांगत असल्याचे ऐकू येत आहे.

फ्लुएन्टेस हा मूळचा सुक्रे, व्हेनेझुएलाचा होता. त्याच्या पूर्वीच्या पत्नीसह त्याला तीन मुले होती. फ्युएन्टेस बोनाओ, ब्यूनस आयर्स येथे ड्रग्जचा व्यापार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

अंमली पदार्थांच्या तस्करांसोबतच्या बेकायदेशीर व्यवहारामुळे त्याला 'तालिबान' म्हणून ओळखले जात असे.

68-year-old Drug Smuggler Thrown Into The Sea For Theft Of Cocaine.
"आमचाही तेवढाच हक्क," पाकिस्तान करणार 'INDIA' वर दावा

मिळालेल्या माहितीनुसार, ब्युनोस आयर्समध्ये फ्युएन्टेसच्या टोळीतील दोन जणांना पोलिसांनी नुकतेच ठार केले होते. तपासादरम्यान, पोलिसांनी बोनाओ येथील एका घरातून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात केला होता. ही शस्त्रे फ्युएन्टेसची असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुएन्तेसला 17 जुलै रोजी अज्ञात ठिकाणी कार्टेलच्या बैठकीत उपस्थित राहण्याचे आमिष दाखवण्यात आले. येथे पोहोचल्यानंतर त्याचे अपहरण करून समुद्रात फेकण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com