आईच्या मृतदेहासोबत सहा वर्षे राहत होता वृद्ध मुलगा, तपासात समोर आले विचित्र कारण

निवृत्ती वेतनाच्या पैशांसाठीच तो असे करत होता अशी कबुली त्याने दिली आहे. इटलीतील ही घटना आहे.
dead-body
dead-bodyDainik Gomantak
Published on
Updated on

आईच्या निवृत्ती वेतनाचे पैसे मिळावे यासाठी एक व्यक्ती तब्बल सहा वर्षे मृत आईच्या मृतदेहासोबत राहत होता. आरोपी मुलाचे वय 60 वर्षे असून, त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही.

निवृत्ती वेतनाच्या पैशांसाठीच तो असे करत होता अशी कबुली त्याने दिली आहे. इटलीतील ही घटना आहे.

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीच्या मृत आईचे नाव हेल्गा मारिया हेंगबर्थ असे आहे. शेजाऱ्यांनी हेल्गा कुठे गेली असे विचारले असता ती जर्मनीला परत गेली असे उत्तर द्यायचा.

मागील सहा वर्षांत त्याला आईच्या मृतदेहासोबत जगत 56,000 पौंड (सुमारे 1.59 कोटी रुपये) निवृत्ती वेतनातून पैसे मिळाले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला अग्निशमन दल आणि पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश केला. 25 मे रोजी एका आपत्कालीन घटनेसाठी पोलिसांना इमारतीत प्रवेश करावा लागला.

dead-body
अदानी विल्मर, राजपुरोहित आणि सन्मान स्विटमार्ट यांना गोवा FDA कडून 1.35 लाखांचा दंड, जाणून घ्या प्रकरण

या व्यक्तीने आई हेल्गाचा मृतदेह एका पिशवीत भरून बेडच्या वर ठेवला होता. कोरोना व्हायरसच्या काळातही हेल्गाने तिच्या आरोग्य विमा कार्डसाठी दावा केला नाही. त्यानंतर पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही प्रतिसाद मिळाला नसल्याने पोलिसांचा संशय बळावला असता घराची झडती घेण्यात आली.

दरम्यान, पोलिसांना घरात मृतदेह सापडला. यानंतर हेल्गाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.

पोलिस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी आपल्या मृत आईची पेन्शन कशी घेत होता? हे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत आहे. आरोपी मुलगा दरवर्षी 30 हजार युरो (सुमारे 26.54 लाख रुपये) घेत होता, अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com