मराठी मुलगी म्हणते, "म्हणून पाहिजे वन नेशन, वन इलेक्शन", पाहा व्हायरल व्हिडिओ

आपल्या देशात सतत अनेक निवडणुका होत असतात. यामध्ये पंचायत निवडणुका, नगरपालिका निवडणुका, लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका यांचा समावेश असतो.
One Nation One Election Viral Video
One Nation One Election Viral VideoDainik Gomantak

Video of a Marathi Girl Goes Viral Putting Facts In Support of 'One Nation One Election':

देशात सध्या 'One Nation One Election'ची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी 'वन नेशन, वन इलेक्शन'चा अभ्यास करण्यासाठी माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

अशी चर्चा सुरू असताना पुन्हा एकदा वन नेशन, वन इलेक्शनच्या फायद्या तोट्यांवर लोक बोलू लागले आहेत. दरम्यान वन नेशन, वन इलेक्शनचे फायदे सांगणारा एका विद्यार्थीनीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ 2021 मध्ये पुण्यातील एमआयटी महाविद्यालयात झालेल्या भारतीय छात्र सांसद कार्यक्रमातील आहे.

ट्विटरवर मेघ अपडेट्स नावाच्या एका यूजरने, भारतीय छात्र सांसद कार्यक्रमातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये प्रज्ञा भगत नावाची मुलगी वन नेशन, वन इलेक्शचे फायदे सांगत आहे.

आपल्या चार मिनिटांच्या भाषणात या मुलीने देशात सतत होणाऱ्या निवडणुका, यामुळे खर्च होणारा वेळ, पैसा आणि मनुष्यबळ यावर प्रकाश टाकला.

One Nation One Election Viral Video
Viral Video: वर्णद्वेषाचा आरोप; नेदरलँड्समध्ये भारतीय तरुणीला आफ्रिकन महिलांकडून मारहाण

यामध्ये तिने असाही दावा केला की, 2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, इलेक्शन कमीशनचे 1 हजार 700 कोटी रुपये खर्च झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हा खर्च 4 हजार कोटींपर्यंत पोहचला होता.

ही मुलगी पुढे म्हणाली, हा हजारो कोटींमध्ये होणारा खर्च फक्त लोकसभा निवडणुकांचा आहे. प्रत्येक राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीही इतकाच खर्च होतो. त्यामुळे जर या निवडणुका एकत्र घेतल्या तर देशाचे हजारो कोटी रुपये वाचतील.

One Nation One Election Viral Video
मैत्रीच्या नात्याला काळीमा! धबधबा दाखवण्याच्या बहाण्याने 19 वर्षांच्या शिक्षिकेवर दोघांकडून बलात्कार

काय आहे वन नेशन, वन इलेक्शन?

सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की 'वन नेशन, वन इलेक्शन' चा अर्थ काय आहे? आपल्या देशात सतत अनेक प्रकारच्या निवडणुका होत असतात. यामध्ये पंचायत निवडणुका, नगरपालिका निवडणुका, लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका यांचा समावेश असतो.

मग, याचा अर्थ देशात फक्त फक्त लोकसभा निवडणुका होणार आणि बाकीच्या सर्व निवडणुका रद्द होणार असा आहे का? असे अजिबात नाही.

'वन नेशन, वन इलेक्शन'चा अर्थ लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेणे आहे, असा होतो. सध्या लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात.

सरकारने आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला तर वेळेवर निवडणुका घेतल्या जातात आणि कोणत्याही राज्यातील सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही तर मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात.

देशात कुठे ना कुठे सतत निवडणुकीचा धुरळा उडत असतो. त्यामुळे या निवडणुका एकाच वेळी घेतल्यास त्यावर सतत होणार खर्च वाचेल असे जाणकारांना वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com