Shocking: बायकोनेच नवऱ्यावर केला वाइफ स्वॅपिंगचा आरोप, 'रोज मला...'

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका महिलेने पतीवर वाइफ-स्वॅपिंगचा आरोप केला आहे.
Couple
CoupleDainik Gomantak
Published on
Updated on

Wife Swapping Case: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने पतीवरच वाइफ-स्वॅपिंगचा आरोप केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या पती आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा आरोप आहे की, पतीने मला जबरदस्तीने दिल्लीतील वाइफ-स्वॅपिंग पार्ट्यांमध्ये नेले आणि आपल्याच भावासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

आणखी काय म्हणाले पीडितेने तक्रारीत

पीडितेने मुझफ्फरनगरमधील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी-I (ACJM1) न्यायालयासमोर केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 'पती मला वारंवार धमकावत असे आणि जबरदस्तीने अशा पार्टीत नेत असे.'

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे (Women) जून 2021 मध्ये लग्न झाले होते, त्यानंतर ती गुरुग्रामला वास्तव्यास आली होती. हे तिचे दुसरे लग्न होते. 'जर मी वाइफ स्वॅपिंग पार्ट्यांमध्ये जाण्यास नकार दिला तर पती मला मारहाण करायचा. त्याशिवाय लैंगिक अत्याचारही करायचा,' असेही पीडितेने सांगितले.

पीडितेने पुढे सांगितले की, ''24 एप्रिलला मी गुरुग्राममध्ये पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) जाण्याचा प्रयत्न केला, परंतु वाटेत मला माझ्या पतीच्या गुंडांनी अडवले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यांनी मला दिली.''

दुसरीकडे, न्यू-मंडी पोलिस स्टेशनचे एसएचओ सुशील कुमार सैनी म्हणाले, “आम्ही महिलेच्या पती आणि मेहुण्याविरुद्ध कलम 376 (बलात्कार), 307 (हत्येचा प्रयत्न), 323 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 504 (शांतता भंग). आणि IPC चे कलम 506 (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुग्राममध्ये घडली आहे, हे प्रकरण संबंधित पोलिस स्टेशनकडे वर्ग केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com