Punjab and Haryana High Court: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने 19 वर्षीय विद्यार्थिनीसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्याची इच्छा बाळगणाऱ्या शिक्षकाची संरक्षणाची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, ''शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात पवित्र नातं असतं, ते जपलं की अधिक चांगल्यारितीने फुलतं. या नात्याची प्रतिष्ठा ठेवा.'' न्यायालयाने याचिका फेटाळताना 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. तो याचिकाकर्त्याला बार असोसिएशनच्या वकिलांच्या कल्याण खात्यात जमा करावा लागणार आहे.
याचिका दाखल करताना शिक्षक आणि विद्यार्थिनीने न्यायालयाकडे संरक्षणाची मागणी केली होती. शिक्षकाने सांगितले होते की, 'दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत, त्यामुळे त्यांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे, मात्र मुलीचे कुटुंबीय विरोध करत आहेत.' या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आलोक जैन म्हणाले की, 'एक विवाहित शिक्षक जो एका मुलाचा पिता देखील आहे, त्याला आपल्याच 19 वर्षीय विद्यार्थिनीसोबत घटस्फोट न देता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची इच्छा आहे, हे आश्चर्यकारक आहे.' अशा याचिकांबाबत कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, तरच समाजात योग्य संदेश जाईल, असेही न्यायालयाने पुढे म्हटले. दुसरीकडे, याचिकाकर्त्याच्या वकिलानेही याचिका मागे घेण्याचे न्यायालयाला सांगितले, मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावत दंड ठोठावला.
कलम 226 अंतर्गत संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका शिक्षक-विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, 'पहिल्या जोडीदाराला घटस्फोट न देता दुसऱ्या जोडीदारासोबत राहणे देखील आयपीसीच्या कलम 494, 495 अंतर्गत द्विपत्नीत्वाचा गुन्हा ठरु शकतो.' या याचिकेची शहानिशा करुन न्यायालयाने शिक्षकाला प्रतिबंधक म्हणून दंड ठोठावला आणि ही रक्कम उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या वकिलांच्या कल्याण खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.