मोदी सरकारचा मोठा निर्णय, 22 YouTube चॅनेल केले ब्लॉक, 4 पाकिस्तानशी जोडलेले

IT नियम, 2021 अंतर्गत 18 भारतीय YouTube न्यूज चॅनेल पहिल्यांदाच ब्लॉक करण्यात आले आहेत.
YouTube
YouTubeDainik Gomantak

भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार प्रसार करण्यासाठी 22 YouTube चॅनेलचा वापर होत असल्याचे सांगत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केले आहेत. IT नियम, 2021 अंतर्गत 18 भारतीय YouTube न्यूज चॅनेल पहिल्यांदाच ब्लॉक करण्यात आले आहेत. पाकिस्तानमधील चार यूट्यूब वृत्तवाहिन्याही बंद करण्यात आल्या आहेत. दर्शकांची दिशाभूल करण्यासाठी YouTube चॅनेलने लोगो आणि टीव्ही न्यूज चॅनेलच्या खोट्या लघुप्रतिमांचा वापर केला आहे.

YouTube
जैसलमेरमध्ये मोठा अपघात: चालत्या बसमध्ये करंट लागून 3 प्रवाशांचा मृत्यू, 5 जणांची प्रकृती गंभीर

याशिवाय तीन ट्विटर (Twitter) अकाऊंट, एक फेसबुक अकाउंट आणि एक न्यूज वेबसाइटही ब्लॉक करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ''नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत 18 भारतीय यूट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत. तर पाकिस्तानचे चार यूट्यूब न्यूज चॅनेलही बंद करण्यात आले आहेत. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा, परदेशांशी संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेबाबत अपप्रचार केल्याचा आरोप असून, त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.''

तसेच, सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ''भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर आणि इतर अनेक मुद्द्यांवर खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यामुळे याची दखल घेण्यात आली आहे. यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवर अशा प्रकारचा भारतविरोधी मजकूर पसरवणाऱ्यांविरुद्धची कारवाई पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहे. यामध्ये पाकिस्तानच्या नियोजित प्रचाराचा समावेश आहे.''

YouTube
पक्षाच्या गटबाजीमुळे तेलंगणा काँग्रेसची बिकट अवस्था! राहुल गांधींची नेत्यांसोबत बैठक

आयबी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ''युक्रेनमधील (Ukraine) सध्याच्या परिस्थितीबद्दल भारतातील काही यूट्यूब चॅनेलद्वारे चुकीची माहिती प्रसारित केली जात होती. त्यामुळे भारताच्या इतर देशांसोबतच्या संबंधांवर परिणाम होण्याचा धोका होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.'' विशेष म्हणजे नव्या आयटी नियमांनुसार, ''सरकारला सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करण्यांवर रोख लावण्यासाठी विशेषाधिकार देण्यात आला आहे. वृत्तवाहिन्यांनाही अशा प्रकारच्या अपप्रचाराशी संबंधित तक्रारींवर कारवाई करण्यासाठी तक्रार निवारण अधिकाऱ्यांप्रमाणे सर्व व्यवस्था करण्यास सांगितले आहे. खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी विशेष देखरेख यंत्रणाही तयार करण्यात आली आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com