जैसलमेरमध्ये मोठा अपघात: चालत्या बसमध्ये करंट लागून 3 प्रवाशांचा मृत्यू, 5 जणांची प्रकृती गंभीर

भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या जैसलमेर जिल्ह्यात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली
Accident
AccidentDainik Gomantak

जैसलमेर: भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या जैसलमेर (Jaisalmer) जिल्ह्यात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे एका चालत्या बसला अचानक करंट लागला. त्यामुळे बसमधील 8 प्रवासी भाजले गेले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे तर पाच जणांवर उपचार सुरू आहेत. यातील एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. संत सदारामच्या जत्रेला हजेरी लावून अपघातग्रस्त घरी परतत होते. यादरम्यान हा अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Accident
पक्षाच्या गटबाजीमुळे तेलंगणा काँग्रेसची बिकट अवस्था! राहुल गांधींची नेत्यांसोबत बैठक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरपासून 15 किमी अंतरावर सदर पोलीस स्टेशन परिसरात सकाळी 10 वाजता पोलजीच्या डेअरीजवळ हा अपघात झाला. परिसरातील खिनिया व खुईयाळा गावातील ग्रामस्थ भाड्याने खासगी बस घेऊन लोकदैवत संत सदाराम यांच्या जत्रेला गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला. या अपघातानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली.

या भागात रस्त्याची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे . यावरून जाणाऱ्या तारा थोड्या खालच्या बाजूला झूकल्या होत्या. बसच्या आतील बाजूशिवाय तिच्या छतावरही भाविक बसले होते. तेथून निघताना बसच्या छतावर बसलेले प्रवासी वरून जाणाऱ्या विद्युत तारांच्या संपर्कात आले. करंटच्या कचाट्यात येताच संपूर्ण बसमध्ये करंट पसरला. मात्र तरीही चालकाने तत्परतेने बस पुढे नेल्याने विद्युत प्रवाह काही काळच टिकू शकला. मात्र तोपर्यंत आठ जण करंटने गंभीररित्या भाजले होते.

Accident
वेड्या बहिणीची वेडीही माया; 10 वर्षांच्या मुलीचा शाळेतील व्हिडिओ व्हायरल

बसमध्ये खूप प्रवासी होते

माहिती मिळताच गावकरी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमींना जैसलमेरच्या जवाहिर रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. पाच गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी प्रतिभा सिंह, पोलिस अधीक्षक भंवरसिंह नाथवत आणि आमदार रूपराम धनदेव यांनीही रुग्णालयात पोहोचून जखमींची प्रकृती जाणून घेतली. सर्व मृत आणि जखमी मेघवाल समाजाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक प्रवाशांना बसमध्ये बसवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये जागा नसताना लोक बसच्या छतावर बसले असता हा अपघात झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com