भाजपने राज्यसभेत लगावली सेंचुरी, जाणून घ्या कोणत्या पक्षाचे किती सदस्य

1990 नंतर 100 चा आकडा गाठणारा हा पहिलाच पक्ष ठरला आहे. राज्यसभेने (Rajya Sabha) अधिकृतपणे माहिती दिली आहे.
Rajya Sabha
Rajya SabhaDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : भाजपने राज्यसभेत शतक ठोकले आहे. 1990 नंतर 100 चा आकडा गाठणारा हा पहिलाच पक्ष ठरला आहे. राज्यसभेने यासंबंधीची अधिकृतपणे माहिती दिली आहे. आसाममधून एक, त्रिपुरा (Tripura) आणि नागालँडमधून (Nagaland) एक अशा तीन राज्यसभेच्या जागा भाजपने (BJP) जिंकल्या आहेत. नुकत्याच सहा राज्यांतील 13 जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. 2014 मध्ये भाजपचे 55 सदस्य होते आता ही संख्या 100 वर गेली आहे. राज्यसभेत 245 सदस्य आहेत, 123 हाफ वे मार्क्स आहेत. यापूर्वी 1990 मध्ये काँग्रेसचे 108 सदस्य होते. काँग्रेसची (Congress) सदस्य संख्या आता 30 वर आली आहे. आता लवकरच सुमारे 52 जागांवर मतदान होणार आहे, जे आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील असतील.

Rajya Sabha
राज्यसभेत सहा नवनिर्वाचित सदस्यांनी पद आणि गोपनीयतेची घेतली शपथ

दरम्यान, जर राज्यसभेच्या 13 जागाबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपने पंजाबमध्ये एक जागा गमावली, परंतु तीन ईशान्येकडील राज्यांमधून प्रत्येकी एका जागेसह हिमाचल प्रदेशातील सर्व जागा जिंकल्या आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने पाचही जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे मात्र, भाजप अजूनही राज्यसभेत बहुमतापासून दूर आहे. 2014 नंतर 2019 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला लोकसभेत प्रचंड बहुमत मिळाले आहे. गेल्या काही वर्षांत भाजपने बहुतांश राज्यांमध्ये आपली सत्ता कायम ठेवली आहे किंवा स्थिती सुधारली आहे.

सभागृहात स्थान घेण्यापूर्वी घ्यावी लागते शपथ

सभागृहात आपले स्थान घेण्यापूर्वी, राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याला राष्ट्रपती (President) किंवा त्या वतीने नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर शपथ घ्यावी लागते.

राज्यातील पहिल्या महिला

नागालँडमधून (Nagaland) एकमेव राज्यसभेच्या जागेवर भाजपच्या (BJP) एस.फान्सगॉन कोन्याक यांची बिनविरोध निवड झाली आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात स्थान मिळविणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com