वाद वाढला! सौराष्ट्र विद्यापीठात महात्मा गांधींविरोधात कविता पठण, कवीने मागितली माफी

गुजरातमध्ये काव्यवाचनातून महात्मा गांधींचा अपमान केल्याची घटना समोर आली.
Mahatma Gandhi
Mahatma GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

गुजरातमध्ये (Gujarat) काव्यवाचनातून महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) अपमान केल्याची घटना समोर आली. मध्य प्रदेशातील कवी देवकृष्ण व्यास यांच्या कवितेतील काही शब्दांमुळे हा वाद निर्माण झाला आहे वास्तविक हे काव्यवाचन सौराष्ट्र विद्यापीठात आयोजित काव्य महाकुंभ कार्यक्रमांतर्गत झाले आहे. देवकृष्ण व्यास यांच्या कवितेतील वादग्रस्त शब्दांबद्दल बोलताना असे म्हणतात की, ‘चरखा, चरखा करते थे सब, जब जरूरत पड़ी मशाल की, आजादी के नायक थे तुम, कैसे खलनायक जीत गए…’ (The argument increased Poetry recitation against Mahatma Gandhi in Saurashtra University poet apologizes)

Mahatma Gandhi
Union Home Minister's Medal: 28 महिलांसह 151 पोलीस कर्मचार्‍यांचा गौरव

तर दुसरीकडे सौराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.गिरीश भिमानी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत कार्यक्रमात असे का घडले? त्याची देखील तपासणी केली जाईल. मात्र, वाद वाढत असल्याचे पाहून कवी देवकृष्ण व्यास यांनी माफी मागितली तर कवी व्यास म्हणाले की, ही कविता मी 15 ऑगस्टला लिहिली आहे. तसेच गांधीजींविरुद्ध शब्दांतून लिहिण्याचा माझा हेतू नव्हता. यात वापरलेले शब्द इंग्रजांची खुशामत करणाऱ्यांसाठी लिहीले आहेत. मी मोहम्मद अली जिना यांना खलनायक म्हटले आहे आणि माझी बापूंवर नितांत श्रद्धा आहे.

ते म्हणाले की, 'कवितेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो आणि गांधीजींविरुद्ध कविता करायचा माझा हेतू नव्हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com