'पत्नीने 60 वर्षे तुमची काळजी घेतली, पण तुम्ही...' SC ने 89 वर्षीय वृद्धाची घटस्फोटाची मागणी फेटाळली

Supreme Court Judgement: सर्वोच्च न्यायालयाने 89 वर्षांच्या वृद्धाला घटस्फोट देण्यास नकार दिला आहे.
Supreme Court
Supreme Court Dainik Gomantak
Published on
Updated on

Supreme Court Judgement: सर्वोच्च न्यायालयाने 89 वर्षांच्या वृद्धाला घटस्फोट देण्यास नकार दिला आहे. या वृद्धाने आपल्या 82 वर्षांच्या पत्नीपासून घटस्फोटाची मागणी न्यायालयात केली होती.

न्यायालयाने म्हटले की, भारतीय समाजात लग्न हे आध्यात्मिक मिलन आणि पवित्र नाते मानले जाते. त्यामुळे, केवळ लग्न मोडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे या आधारावर घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही. त्यानंतर न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

1963 मध्ये वृद्धाचे लग्न झाले

न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही न्यायाधीशांनी म्हटले की, 'तुमच्या पत्नीने 60 वर्षे नात्याचे पावित्र्य जपले. हे लग्न 1963 मध्ये झाले.

या काळात पत्नीने तुमच्या 3 मुलांचा सांभाळ केला, पण या काळात तुम्ही पत्नीशी शत्रूसारखे वागलात. पत्नी अजूनही तुमची काळजी घेण्यास तयार आहे, तिला घटस्फोटाचा (Divorce) कलंक घेऊन जग सोडायचे नाही. आयुष्याच्या या टप्प्यावरही ती तुम्हाला एकटे सोडू इच्छित नाही.'

Supreme Court
Supreme Court: 'हे एकच प्रकरण नाही, आणखी महिला...'; मणिपूरवरील सुनावणीदरम्यान CJI नी मागितली आकडेवारी

घटस्फोट हा समकालीन समाजातील कलंक नाही

न्यायालयाने हा अन्याय असल्याचे म्हटले आहे. घटस्फोट हा समकालीन समाजातील कलंक नाही, असेही न्यायालयाने म्हटले. पण आम्हाला तुमच्या पत्नीच्या भावनांची कदर आहे. त्यामुळे पत्नीची इच्छा लक्षात घेऊन घटस्फोटाची परवानगी देता येणार नाही.

यानंतर न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. कलम 142 अन्वये लग्न मोडण्याच्या आधारावर घटस्फोट दिला जात असेल तर तो प्रतिवादीला न्याय देणार नाही, असे दोन्ही न्यायाधीशांनी म्हटले. न्यायालय कोणावरही अन्याय करु शकत नाही. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) वृद्धाची याचिका फेटाळून लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com