विशेष अधिवेशनामागे दडलंय काय? वन नेशन-वन इलेक्शन, समान नागरी कायदा की आणखी काही...

Special Session of Parliament: पंतप्रधान मोदींनी अनेकदा आपल्या निर्णयांनी लोकांना आश्चर्यचकित केले आहे. या विशेष अधिवेशनातही ते काहीतरी मोठे सरप्राईज देऊ शकतात. अशी चर्चा सर्वत्र आहे.
Special Session of Parliament has been called from September 18 to 22 By Modi Government.
Special Session of Parliament has been called from September 18 to 22 By Modi Government.Dainik Gomantak

Special Session of Parliament has been called from September 18 to 22 By Modi Government:

मोदी सरकारने पुन्हा एकदा आपल्या निर्णयाने सर्वांना चकित केले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन काही दिवसांपूर्वीच संपले असून, आता 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन (Special Session of Parliament) बोलावण्यात आले आहे.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना या निर्णयाची माहिती देण्यात आली. संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या बातमीनंतर अचानक वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सरकारने हे विशेष अधिवेशन का बोलावले? निवडणुकीपूर्वी हिवाळी अधिवेशनही आहे, मग त्यापूर्वीच हा निर्णय का घेण्यात आला. या निर्णयावरही विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

यातील काहींनी हे अधिवेशन मुदतपूर्व निवडणुका, वन नेशन वन इलेक्शन किंवा समान नागरी कायद्याचे विधेयक केंद्र सरकार मांडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

Special Session of Parliament has been called from September 18 to 22 By Modi Government.
विवाहाच्या वैधतेसाठी भटजींची गरज नाही: सुप्रीम कोर्ट

मुदतपूर्व निवडणुका?

या सर्व गोंधळात आणखी एक चर्चा जोरात सुरू आहे, ज्याचा विरोधी पक्षातून उल्लेख केला जात आहे. यावेळी मोदी सरकार वेळेपूर्वी निवडणुका घेऊ शकते, असे दावे विरोधकांकडून केले जात आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वतीने असा दावा करण्यात आला की, सरकार डिसेंबरमध्येच लोकसभा निवडणुका घेऊ शकते. असा दावाही नितीशकुमार यांच्या वतीने करण्यात आला आहे.

काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि त्याबरोबरच लोकसभा निवडणुका होऊ शकतात, अशी चर्चा आहे.

मात्र, सरकारचे मंत्री आणि भाजपचे नेते अशा गोष्टीचा इन्कार करत आहेत. निवडणुकीसाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही.

Special Session of Parliament has been called from September 18 to 22 By Modi Government.
Kaushal Kishor: केंद्रीय मंत्र्याच्या घरी कार्यकर्त्याची हत्या, मुलाचे पिस्तूल जप्त

समान नागरी कायदा की वन नेशन, वन इलेक्शन?

काही महिन्यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

५ दिवसांच्या या विशेष अधिवेशनात सरकार काही महत्त्वाची विधेयके मंजूर करू शकते. त्यामुळे समान नागरी कायद्याबाबत (Uniform Civil Code) चर्चा देखील सुरू झाली आहे.

या अधिवेशनात सरकार वन नेशन, वन इलेक्शन (One Nation, One Election) विधेयकही आणू शकते, अशीही चर्चा आहे. पंतप्रधान मोदी बराच काळ हा मुद्दा उपस्थित करत आहेत.

संसदेच्या या विशेष अधिवेशनाचा अजेंडा सध्या निश्चित झालेला नाही. G20 बैठकीनंतर त्यावर निर्णय घेतला जाईल.

पंतप्रधान मोदींनी अनेकदा आपल्या निर्णयांनी लोकांना आश्चर्यचकित केले आहे. या विशेष अधिवेशनातही ते काहीतरी मोठे सरप्राईज देऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com