Kaushal Kishor: केंद्रीय मंत्र्याच्या घरी कार्यकर्त्याची हत्या, मुलाचे पिस्तूल जप्त

BJP Worker Shot Dead: पोलिसांनी घटनास्थळावरून केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलाचे पिस्तूल जप्त केले आहे. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
BJP worker was shot dead at the Dubagga home of Union Minister of State Kaushal Kishore.
BJP worker was shot dead at the Dubagga home of Union Minister of State Kaushal Kishore.Dainik Gomantak

BJP worker was shot dead at the Dubagga home of Union Minister of State Kaushal Kishore:

केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर यांच्या दुबग्गा येथील घरी शुक्रवारी पहाटे 28 वर्षीय विनय श्रीवास्तव यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोळी विनयच्या कपाळावर लागली आहे.

हत्येची माहिती मिळताच डीसीपी पश्चिम राहुल राज, एसीपी काकोरी अनुप कुमार सिंह पोलिसांच्या ताफ्यासह दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले.

मंत्र्यांच्या मुलाचे पिस्तूल जप्त

पोलिसांनी घटनास्थळावरून केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलाचे पिस्तूल जप्त केले आहे. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांचे दुबग्गाच्या बेगारिया येथे घर आहे. भाजप कार्यकर्ता विनय श्रीवास्तव (२४) आणि भाजप खासदाराचा मुलगा विकास किशोर येथे राहत होते.

शुक्रवारी पहाटे चार वाजता विकास किशोर यांच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. गोळी विनयच्या डोक्यात लागली.

अजय रावत, अंकित वर्मा, शमीम बाबा आणि इतर दोन लोक घटनास्थळी उपस्थित होते. कुटुंबीयांनी अजय, अंकित आणि शमीम यांच्यावर खुनाचा आरोप करत फिर्याद दिली आहे.

BJP worker was shot dead at the Dubagga home of Union Minister of State Kaushal Kishore.
विवाहाच्या वैधतेसाठी भटजींची गरज नाही: सुप्रीम कोर्ट

घटनेच्या वेळी मुलगा विकास किशोर दिल्लीत होता, असे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितले. तो आजारी आहे त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यासाठी कालच विकास दिल्लीला गेला होता.

मंत्री कौशल किशोर म्हणाले की, हत्या झाली तेव्हा घरात कोण-कोण उपस्थित होते, हे मला माहीत नाही.

BJP worker was shot dead at the Dubagga home of Union Minister of State Kaushal Kishore.
VIDEO: चंद्रावर भूकंप? प्रज्ञान रोव्हरच्या संदेशाचा ISRO करतंय अभ्यास

घटनेची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री घटनास्थळी पोहोचले होते. ते विनय श्रीवास्तवच्या कुटुंबियांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

"घटनेची माहिती मिळताच मी तातडीने पोलीस आयुक्तांना फोन करून माहिती दिली. विनय श्रीवास्तव आम्हाला जवळपास सहा वर्षांपासून ओळखत होता. त्यामुळे त्याचे आमच्याकडे येणे जाणे असायचे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल." असेही, केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com