छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 2 महिलांसह 6 नक्षलवादी ठार

Chhattisgarh: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन महिला नक्षलवाद्यांसह सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
Naxalites Encounter
Naxalites EncounterDainik Gomantak

Encounter Between Security Forces And Naxalites: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन महिला नक्षलवाद्यांसह सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला. बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की, बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिप्पूरभट्टी गावाजवळील ताल्पेरु नदीच्या काठावर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन महिला नक्षलवाद्यांसह सहा नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सुंदरराज यांनी पुढे सांगितले की, नक्षलविरोधी ऑपरेशनचा एक भाग म्हणून बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा दलांना पाठवण्यात आले होते.

दरम्यान, या ऑपरेशनमध्ये जिल्हा जिला रिजर्व्ह गार्ड (DRG), केंद्रीय राखीव पोलीस दल आणि त्याची एलिट युनिट CoBRA (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन) यांचा समावेश होता. त्यांनी सांगितले की, जेव्हा टीम परिसरातील चिप्पूरभट्टी गावाजवळ ताल्पेरु नदीच्या काठावर पोहोचली तेव्हा प्लाटून क्रमांक 10 च्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरु केला. यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले.

Naxalites Encounter
Chhattisgarh Crime: सहा महिन्यांत 173 अटक, 194 सरेंडर अन् 33 ठार; छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरोधीतील कारवाई तीव्र

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गोळीबार थांबल्यानंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळाची झडती घेतली असता, दोन महिलांसह सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. विजापूर जिल्हा बस्तर लोकसभा मतदारसंघात येतो, जिथे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com