PM मोदींचा गौरव! 2014 पासून 14 देशांनी सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाने केले सन्मानित

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुलै 2023 मध्ये फ्रान्सकडून 'लीजन ऑफ ऑनर'ने सन्मानित करण्यात आले होते.
PM Modi
PM ModiDainik Gomantak

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुलै 2023 मध्ये फ्रान्सकडून 'लीजन ऑफ ऑनर'ने सन्मानित करण्यात आले होते. फ्रान्सचा हा सर्वोच्च सन्मान आहे. यासह पंतप्रधान मोदी हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. जगातील विविध देशांमधून पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 14वा सर्वोच्च सन्मान आहे. याआधी पंतप्रधान मोदींना इजिप्तमध्ये ऑर्डर ऑफ द नाईलने सन्मानित करण्यात आले होते. चला मग जाणून घेऊया पंतप्रधान मोदींना आतापर्यंत कोणत्या देशांमध्ये सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे...

दरम्यान, 2014 पासून पंतप्रधान मोदींना 14 देशांनी सन्मानित केले आहे, त्यापैकी 7 इस्लामिक देश आहेत. राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी संसदेत सांगितले की, पंतप्रधानांना विविध राष्ट्रीय सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. "भारताच्या पंतप्रधानांना सर्वोच्च पुरस्कार प्रदान करणे हे द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरील त्यांच्या राजकारणाची आणि नेतृत्वाची स्पष्ट ओळख आहे," असे राज्यमंत्र्यांनी संसदेत सांगितले. या 14 पुरस्कारांसोबतच, पंतप्रधान मोदींना 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने UN चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार देखील प्रदान केला.

PM Modi
PM Modi America Visit: 'पीएम मोदींचे ऐतिहासिक भाषण ऐकण्यासाठी आम्ही...,' अमेरिकन खासदार म्हणाले; पाहा व्हिडिओ

तसेच, पंतप्रधान म्हणून तिसर्‍यांदा निवडणूक लढवण्याची तयारी पीएम मोदींनी केल्याने त्यांच्या जागतिक मान्यता रेटिंगमध्येही वाढ झाली आहे. 76 टक्के रेटिंगसह जागतिक मान्यता क्रमवारीत पंतप्रधानांचे वर्चस्व आहे.

जुलै 2023: फ्रान्सने पंतप्रधान मोदींना लीजन ऑफ ऑनरने सन्मानित केले.

जून 2023: इजिप्तमध्ये ऑर्डर ऑफ द नाईलने सन्मानित

मे 2023: पापुआ न्यू गिनी द्वारे कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू पुरस्काराने सन्मानित.

मे 2023: पीएम मोदींना फिजीमध्ये कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजीने सन्मानित करण्यात आले.

मे 2023: पलाऊ प्रजासत्ताकातर्फे पंतप्रधान मोदींना एबाकल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2021: भूतानने पंतप्रधान मोदींचा ड्रुक ग्याल्पो देऊन गौरव केला.

2020: अमेरिकेने पंतप्रधान मोदींना लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित केले.

2019: पीएम मोदींना बहरीनने किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्सने सन्मानित केले.

2019: मालदीवने निशान इज्जुद्दीनच्या ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुलने सन्मानित केले.

2019: रशियाने पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्काराने सन्मानित केले.

2019: PM मोदींना UAE कडून ऑर्डर ऑफ झायेद पुरस्काराने सन्मानित.

2018: पंतप्रधान मोदींना ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

PM Modi
PM Modi America Visit: '...पंतप्रधान मोदी 'या' मशिदीला भेट देणार,' दाऊदी बोहरा समुदायाशी आहे खास कनेक्शन

2016: मोदींना अफगाणिस्तानने स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान पुरस्काराने सन्मानित केले.

2016: पंतप्रधानांना सौदी अरेबियाने ऑर्डर ऑफ अब्दुलाझीझ अल सौदने सन्मानित केले.

या आंतरराष्ट्रीय संस्थांनीही पंतप्रधान मोदींचा गौरव केला आहे

- ग्लोबल एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंट लीडरशिप अवॉर्ड: 2021 च्या सुरुवातीला, पीएम मोदींना केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स CERA द्वारे ग्लोबल एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंट लीडरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.

- 2019 मध्ये पीएम मोदींना बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

- 2018 मध्ये, पीएम मोदींना संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

- पीएम मोदींना 2018 मध्ये सेऊल पीस प्राइज कल्चरल फाऊंडेशनने सेऊल पीस प्राइज प्रदान केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com