मोबाईलवर पाहत होता अश्लिल व्हिडीओ, ‘सीबीआय’ची आली नोटीस; त्यानंतर काय झाले? वाचा संपूर्ण प्रकरण

West Bengal Crime: मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर पॉर्न पाहण्याचा शौक तुम्हाला अडचणीत आणू शकतो.
West Bengal Crime
West Bengal CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

West Bengal Crime: मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर पॉर्न पाहण्याचा शौक तुम्हाला अडचणीत आणू शकतो. बंदी घातलेल्या साइट्सवर क्लिक केल्याने तुम्ही पोलिसांच्या रडारवर तर येतातच, पण फसवणूक करणारेही तुम्हाला फसवणुकीचे बळी बनवू शकतात. दरम्यान, तुम्हालाही अशा प्रकारचा शौक असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरु शकते. ही बातमी तुम्हाला सावध करण्यासाठी आहे, जेणेकरुन तुम्ही नव्या अडचणीत अडकून तुमच्या आयुष्याची कमाई वाया घालवू नये. होय, हे होऊ शकते. पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे राहणाऱ्या तरुणासोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे.

सिलीगुडीतील ज्येष्ठ वकील अत्री शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एका क्लायंटला सीबीआयकडून नोटीस मिळाली. जेव्हा त्यांचा क्लायंट ही नोटीस घेऊन त्यांच्याकडे आला. मात्र, चौकशी केली असता या नोटीसचा सीबीआयशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले. तर ठगांच्या टोळीने सीबीआयच्या सीलची कॉपी करुन क्लायंटची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फसवणूक करणाऱ्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला की, त्यांच्या क्लायंटने प्रतिबंधित पॉर्न साइट ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला. खरेतर, पीडित त्याच्या मोबाईलवर अनेकदा पॉर्न व्हिडिओ पाहायचा. या क्रमात त्याने अनेक वेळा चाइल्ड पॉर्नही सर्च केले.

West Bengal Crime
West Bengal Crime: मित्रच बनले वैरी! मोबाईल गेमसाठी 18 वर्षीय मित्राची निर्घुण हत्या; अन् नंतर...

सीबीआयचा मेल पाहून तरुण घाबरला

त्याने आपल्या वकिलाला सांगितले की, रात्री पॉर्न साइट सर्फिंग केल्यानंतर तो आपला मोबाईल बंद करुन झोपला. सकाळी उठून त्याने मेल पाहिला तेव्हा त्यात त्याला सीबीआयची नोटीस दिसली. यामध्ये त्याला गंभीर कलमांखाली आरोपी ठरवून सीबीआय मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे, एक हेल्पलाइन नंबरही देण्यात आला होता. मात्र, हे पाहून तो खूपच घाबरला आणि घाबरुन त्याने वकिलाला फोन करुन संपूर्ण माहिती दिली. यानंतर वकिलाने त्याला धीर धरण्यास सांगितले आणि तोच ईमेल त्याला फॉरवर्ड करण्यास सांगितले.

West Bengal Crime
West Bengal Crime: सैतानांची बळी ठरली चौथीतली कोवळी विद्यार्थीनी... सामूहिक बलात्कार करणारे नराधम गजाआड!

भारतात अनेक वेबसाइट्सवर बंदी आहे

वकिलाच्या म्हणण्यानुसार, त्याने तो ईमेल पाहिल्यानंतर लगेचच तो बनावट असल्याचे त्याच्या लक्षात आले. मग त्याने त्या मेलची चौकशी केली आणि त्याच्या क्लायंटला परिस्थितीबद्दल माहिती दिली. यानंतर त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. भारतात शंभरहून अधिक पॉर्न साइट्सवर बंदी घालण्यात आली आहे. या साइट्स ओपन करणे देखील गुन्हा आहे. मात्र, सरकारनेच या साइट्सवर फायरवॉल लावली आहे. यामुळे या साइट्स भारतातील कोणत्याही नेटवर्कवर ओपन होत नाही. चाइल्ड पॉर्नशी संबंधित साइट्स यामध्ये महत्त्वाच्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com