Trending News: हरिद्वार येथील अखंड परमधाम आश्रमात तीन रशियन जोडप्यांनी भारतीय रितीरिवाजानुसार विवाह केला. 50 रशियन नागरिकांचा समूह आध्यात्मिक यात्रेसाठी हरिद्वारला आला होता.
इथे त्यांना भारतीय संस्कृती आणि सभ्यता इतकी आवडली की, 50 पैकी तीन रशियन जोडप्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिन्ही जोडप्यांचे आश्रमात पूर्ण विधी पार पडले.
या विवाहात रशियन नागरिकांसह इतर नागरिकांनी (Citizens) ढोल आणि उत्तराखंडी वादनावर डान्स केला. प्रथम भारतीय रितीरिवाजांनुसार तिन्ही वरांची मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान, तिन्ही जोडप्यांनी आश्रमात बांधलेल्या शिवमंदिरात शंकराचे आशीर्वाद घेतले. अखंड परमधामचे अध्यक्ष स्वामी परमानंद गिरी यांचा आशीर्वाद घेऊन जोडप्यांनी एकमेकांना पुष्पहार घातले आणि त्यानंतर पारंपारिक मंत्रोच्चारात सात फेरे घेतले.
स्वामी परमानंद गिरी यांनी सांगितले की, पाश्चात्य संस्कृतीला कंटाळलेल्या रशियन नागरिकांनी भारतीय संस्कृती स्वीकारुन विवाह (Marriage) केला आणि सात जन्म एकमेकांसोबत राहण्याचे वचन दिले.
दुसरीकडे, विवाहित जोडप्यांसह इतर रशियन नागरिकांनीही लग्नाचा आनंद लुटला. लग्नसमारंभात वरांनी शेरवानी परिधान केली होती. तर नववधूंनी भारतीय लेहेंगा परिधान केला होता.
रशियन नागरिकांनी सांगितले की, याआधीही अनेक रशियन नागरिकांनी भारतीय परंपरेनुसार लग्न केले आहे आणि अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही ते आपले जीवन आनंदाने जगत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.