देशात मॉन्सून 8 जुलैपासून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता !

दक्षिण भारतामधील राज्ये (South India) आणि पश्चिम किनारपट्टीय भाग, पूर्व मध्य भारतामध्ये 8 जुलैपासून मॉन्सून (Monsoon) पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे.
Monsoon
MonsoonDainik Gomantak
Published on
Updated on

सांख्यिकीय हवामानाच्या अंदाजानुसार, दक्षिण भारतामधील राज्ये (South India) आणि पश्चिम किनारपट्टीय भाग, पूर्व मध्य भारतामध्ये 8 जुलैपासून मॉन्सून (Monsoon) पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) आणि ओडिशाच्या (Odisha) किनाऱ्यालगतच्या समुद्रामध्ये रविवारी 11 जुलैपर्यंत हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

पूर्व भारताकडे गुरुपासून बंगालच्या उपसागरामधून (Bay of Bengal) बाष्पयुपक्त वारे येणार आहे. शनिवारपर्यंत हे वारे वायव्य भारतामधील पंजाब, हरियाणापर्यंत पसरणार आहे. त्यामुळे मध्य आणि वायव्य भारतामध्ये पावसाला सुरुवात होणार असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.

Monsoon
Goa Monsoon Update: दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

तीन जून रोजी केरळमध्ये मॉन्सूचे आगमन झाल्यानंतर वेगाने वाटचाल करत 19 जून रोजी मॉन्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापला. भिलवाडा, बारमेर, अलिगढ, अंबाला तसेच अमृतसरपर्यंतच्या भागामध्ये मॉन्सूनने धडक दिली. तयानंतर मात्र मॉन्सूनची पुढील वाटचाल पूर्णपणे थांबली. शनिवारपासून वायव्य भारताकडे मॉन्सूनचा प्रवास सुरु होणार असून दिल्लीसह पंजाब हरियाणा, राजस्थानच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागामध्ये पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गुरुवारपासून राज्यामधील काही भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. कोकणातील अनेक भागामध्ये, विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. कोकणातील सिंदुदुर्ग, रत्नागिरी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सध्या घामाच्या धारा

दरम्यान, मॉन्सूनचे दमदार आगमन झाल्यानंतर 20 जूनपासून राज्यामधील काही भागामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. यातच सकाळपासून उन्हाचा दाह वाढत चालला आहे. दुपारच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणेही असह्य झाले आहे. महाराष्ट्रातील जळगाव येथे उन्हाचा ताप खूपच वाढला असून सोमवारी गेल्या दहा वर्षामधील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com