तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू; अनेक जखमी

तामिळनाडूतील विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.
explosion
explosion Dainik Gomantak
Published on
Updated on

Explosion Occurs In A Firecracker Manufacturing Unit In Virudhunagar: तामिळनाडूतील विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी या स्फोटाची माहिती दिली. पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या हवाल्याने सांगितले की, मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. या फटाके बनवणाऱ्या कारखान्याला कशामुळे आग लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना तामिळनाडूमधील वेंबकोट्टई पोलीस स्टेशन अंतर्गत एका ठिकाणी घडली आहे.

यूपीमध्ये फटाक्यांमुळे आग लागली

याआधी बुधवारी यूपीच्या चित्रकूट जिल्ह्यात आयोजित दोन दिवसीय बुंदेलखंड गौरव महोत्सव कार्यक्रमात मोठा स्फोट झाला होता, ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती.

explosion
Tamil Nadu Against Hindi: तामिळनाडू विधानसभेत हिंदी भाषेविरोधात प्रस्ताव मंजूर

दोन लोकांचा मृत्यू झाला

चित्रकूटचे जिल्हा दंडाधिकारी अभिषेक आनंद यांनी सांगितले होते की, चित्रकूट इंटर कॉलेजच्या मैदानात पर्यटन विभागाने दोन दिवसीय बुंदेलखंड गौरव महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बुधवारी संध्याकाळी फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम ठरला होता, त्यासाठी स्टेजच्या मागे फटाके ठेवण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, फटाके फोडण्यापूर्वी दुपारी 3.15 च्या सुमारास अचानक फटाक्यांचा स्फोट झाला आणि तिथे काम करणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाताचा सखोल तपास करण्यात येत आहे. जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com