Haryana Crime: सेक्सला नकार दिल्याने लिव्ह इन पार्टनरवर प्रियकराने केला हल्ला, नंतर...

Haryana Crime: हरियाणातील गुरुग्राम शहरात एका तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केल्याचा आरोप आहे.
Couple
CoupleDainik Gomantak
Published on
Updated on

Haryana Crime: हरियाणातील गुरुग्राम शहरात एका तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला आणि आरोपी दोघेही आधीच विवाहित होते आणि दीर्घकाळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते.

दरम्यान, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या पाटर्नरवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला शुक्रवारी अटक करण्यात आली, असे गुरुग्राम पोलिसांनी सांगितले. शिवम कुमार असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्याला गुरुग्राममधील राजीव चौकातून अटक करण्यात आली असून या संदर्भात सदर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Couple
Punjab and Haryana High Court: "महिलेच्या आत्महत्येस सासरचेच जबाबदार असतील असे नाही"; आरोपींना मुक्त करत, कोर्ट म्हणाले...

तक्रारदार (28, मूळची उत्तर प्रदेश) महिलेने आरोप केला आहे की, शिवमने गुरुवारी तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. मात्र, तिने नकार दिल्यावर रागाच्या भरात त्याने स्क्रू ड्रायव्हरने तिच्यावर हल्ला केला.

पतीपासून वेगळी राहत होती

महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, ती पतीपासून वेगळी झाल्यानंतर गुरुग्राममध्ये भाड्याच्या खोलीत राहत होती, तिथे तिची उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील रहिवासी शिवम कुमारशी भेट झाली. या भेटीचे हळूहळू मैत्रीत रुपांतर झाले आणि त्यानंतर दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहू लागले.

Couple
Haryana: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री यांच्या गाडीचा अपघात, ताफ्यातील सर्व नेते थोडक्यात बचावले

लग्नाच्या बहाण्याने लैंगिक संबंध

महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, आम्ही लिव्ह इनमध्ये आल्यानंतर शिवमने लग्नाच्या बहाण्याने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. नुकतेच मला कळले की, शिवम देखील आधीच विवाहित आहे. गुरुवारी संध्याकाळी त्याने माझ्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान नकार दिल्यानंतर त्याने रागाच्या भरात माझ्यावर हल्ला करुन त्याने तेथून पळ काढला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com