Karnataka Family Suicide: एकाच कुटुंबातील 5 जणांनी गळफास लावून संपवले जीवन; कारण जाणून व्हाल थक्क!

Family Suicide: कर्नाटकातील तुमकुरु शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka Family Suicide: कर्नाटकातील तुमकुरु शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवाजवी व्याजदराच्या छळाला कंटाळून एकाच कुटुंबातील पाच जणांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. जीवन संपवण्याच्या 5.22 मिनिटे आधी, कुटुंब प्रमुख गरीब साब यांनी दोन पानांची डेथ नोट लिहिली होती.

विशेष म्हणजे, एक व्हिडिओ देखील बनवला होता. त्याच इमारतीच्या तळमजल्यावर राहणारा एक व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गरीब साब यांच्या कुटुंबाचा कसा छळ केला आणि त्यांना हे पाऊल उचलण्यास भाग पाडले, हे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

छळाला कंटाळून आत्महत्या केली

दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी (Police) सोमवारी सांगितले की, तुमकुरु शहरात रविवारी रात्री ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी पाच आरोपींनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. त्याचबरोबर, अवाजवी व्याजदर आणि छळाला कंटाळून एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Crime News
Uttar Pradesh Crime: पत्नीचे फेसबुक अकाउंट हॅक करून आक्षेपार्ह पोस्ट, मारहाणीनंतर हाकलले घराबाहेर

दीड लाख रुपये कर्ज होते

वास्तविक, धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबाकडे आरोपींचे (Accused) दीड लाख रुपये थकीत होते, त्यामुळे सदाशिवनगर भागातील कबाब विक्रेते गरीब साब (36), त्यांची पत्नी सुमैया (32), मुलगी हजिरा (14), मुलगा मोहम्मद शाभान (10) आणि मोहम्मद मुनीर (8) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

आरोपी कुटुंबाला मारहाण करायचा

मरण्यापूर्वी गरीब साब यांनी व्हिडिओमध्ये सांगितले होते की, 'तळमजल्यावर एक कलंदर राक्षस राहतो. तो पत्नी आणि मुलांचा छळ करतो आणि मारहाणही करतो. कलंदर अपशब्दांचाही प्रयोग करतो.'

त्यांनी व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, 'माझी पत्नी आणि मुलांना भीती वाटते की मी मेलो तर त्यांना सोडले जाणार नाही. माझ्यासोबत माझी पत्नी आणि मुलेही आत्महत्या करत आहेत.' त्याचबरोबर, या घटनेबाबत टिळक पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com