New Raw Chief: वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा RAW चे नवे प्रमुख, सामंत गोयल यांची घेणार जागा

केंद्रीय मंत्रिमंडळाने वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा यांची देशाची गुप्तचर संस्था RAW (Research & Analysis Wing) चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे.
New Raw Chief: वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा RAW चे नवे प्रमुख, सामंत गोयल यांची घेणार जागा

Senior IPS officer Ravi Sinha: केंद्रीय मंत्रिमंडळाने वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा यांची देशाची गुप्तचर संस्था RAW (Research & Analysis Wing) चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे.

रवी सिन्हा सामंत कुमार गोयल यांची जागा घेतील, ज्यांचा RAW प्रमुख म्हणून कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. रवी सिन्हा यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. सिन्हा सध्या कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. मंत्रिमंडळाच्या अपॉइंटमेंट कमेटीने सिन्हा यांच्या नावाला मंजूरी दिली आहे.

दरम्यान, रवी सिन्हा हे छत्तीसगड (Chhattisgarh) केडरचे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सिन्हा यांच्या आधी सामंत गोयल यांचा रॉ चीफ म्हणून कार्यकाळ अनेक उपलब्धींनी भरलेला होता. सामंत गोयल हे रॉचे प्रमुख असतानाच पाकिस्तानमध्ये बालाकोट एअर स्ट्राइक करण्यात आली होती. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले.

New Raw Chief: वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा RAW चे नवे प्रमुख, सामंत गोयल यांची घेणार जागा
Government vs Governer: राज्यपालांना मंत्री म्हणाले, "भाजपचे एजंट असल्यासारखे वागू नका"

सध्याच्या RAW प्रमुखाचा कार्यकाळ 30 जून रोजी संपणार आहे.

सिन्हा सामंत कुमार गोयल यांची जागा घेतली, ज्यांचा कार्यकाळ 30 जून 2023 रोजी संपत आहे. वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा यांची सोमवारी भारताची गुप्तचर संस्था RAW चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे. सध्याचे प्रमुख सामंत गोयल हे पंजाब केडरचे IPS आहेत.

आयपीएस रवी सिन्हा हे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

रवी सिन्हा हे बिहारमधील (Bihar) भोजपूर जिल्ह्यातील आहेत. सिन्हा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. 1988 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून मध्य प्रदेश केडर प्राप्त केले होते.

तथापि, 2000 मध्ये, जेव्हा तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने मध्य प्रदेशचे विभाजन करुन छत्तीसगड राज्याची निर्मिती केली, तेव्हा सिन्हा तांत्रिकदृष्ट्या छत्तीसगड केडरमध्ये गेले होते.

New Raw Chief: वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा RAW चे नवे प्रमुख, सामंत गोयल यांची घेणार जागा
EX Tamil Nadu DGP Rajesh Das Convicted: महिला IPS चा लैंगिक छळ केल्याप्रकरणी माजी DGP दोषी, न्यायालयाने सुनावली 3 वर्षांची शिक्षा

दुसरीकडे, IPS रवी सिन्हा हे सध्या कॅबिनेट सचिवालयात प्रिंसिपल स्टाफ ऑफिसर (PSO) आहेत. हे पद विशेष सचिव दर्जाचे आहे. आता त्यांची पुढील पोस्टिंग RAW मध्ये प्रमुख पदावर असेल. RAW कडे परदेशी गुप्तचर माहिती गोळा करण्याची जबाबदारी आहे.

कोणत्याही देशाच्या घडामोडींचा भारतावर परिणाम होऊ शकतो, तर त्यावर रॉ लक्ष ठेवते. RAW राष्ट्रहितासाठी ऑपरेशन्स करते. इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये RAW ची स्थापना झाली होती. रामेश्वर नाम काव हे त्याचे पहिले प्रमुख होते. रॉचे रिपोर्टिंग थेट पंतप्रधानांना असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com