Merchant Ship Attacked: समुद्रात आणखी एका जहाजावर ड्रोन हल्ला, भारतीय नौदलाने धाडले INS विशाखापट्टणम; सर्वांना वाचवले

Merchant Ship Attacked: समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ले सुरुच आहेत. गुरुवारीही एका मालवाहू जहाजावर ड्रोनने हल्ला केला.
Merchant Ship Attacked
Merchant Ship AttackedDainik Gomantak
Published on
Updated on

Merchant Ship Attacked: समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ले सुरुच आहेत. गुरुवारीही एका मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला झाला, त्यानंतर भारतीय नौदल अॅक्शनमोड आले. तत्पूर्वी जहाजाने भारतीय नौदलाला इमरजन्सी अलर्ट (SOS) पाठवला होता. सतर्कतेचा इशारा मिळताच नौदलाने शत्रूचा काळ म्हणून ओळखली जाणारी INS विशाखापट्टणम ही विनाशिका युद्धनौका बचावकार्यासाठी पाठवली. खुद्द भारतीय नौदलाने ही माहिती दिली.

एका निवेदनात नौदलाने म्हटले आहे की, भारतीय नौदल युद्धनौका 'INS विशाखापट्टणम' ने पोर्ट एडनच्या दक्षिणेला 60 नॉटिकल मैल अंतरावर व्यावसायिक जहाजावरील ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. जहाजावर 22 क्रू मेंबर्स होते ज्यात नऊ भारतीय होते. बुधवारी रात्री 11.11 वाजता मार्शल आइलॅंड्सवर ध्वजांकित व्यावसायिक जहाज 'एमव्ही जेन्को पिकार्डी'वर ड्रोन हल्ला झाला.

Merchant Ship Attacked
Indian Navy War Ship: कोचीनमध्ये तयार होतेय महाविनाशक युद्धनौका, क्षणार्धात शत्रूचा नाश करेल!

दरम्यान, जहाजाकडून इमरजन्सी अलर्ट मिळताच भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने रात्री 12.30 वाजताच मदत पुरवली. यादरम्यान कोणत्याही क्रूचे नुकसान झाले नाही. भारतीय नौदलाने आयएनएस विशाखापट्टणमला एडनच्या आखातात समुद्री चाच्यांना हुसकावून लावण्यासाठी आणि इतर बचाव कार्यासाठी तैनात केले आहे. न्यूज एजन्सी एएनआयने वृत्त दिले आहे की, आयएनएस विशाखापट्टणममधील भारतीय नौदलाच्या बचाव पथकाने हल्ला झालेल्या जहाजाला आपल्या ताब्यात घेतले आणि खराब झालेल्या भागांची तपासणी केल्यानंतर, त्याला त्याच्या प्रवासाला परत जाण्याची परवानगी दिली. या महिन्याच्या सुरुवातीला नौदल सागरी कमांडोने उत्तर अरबी समुद्रात मालवाहू जहाजावरील 21 क्रू मेंबर्सची सुटका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com