IIT BHU Girl Molestation Case Student Protest In Campus: काशी हिंदू विद्यापीठ आयआयटीमध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. येथे बुधवारी रात्री एक विद्यार्थिनी तिच्या मित्रासोबत युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये फिरत होती. यावेळी तिथे आलेल्या काही अज्ञातांनी तिचा विनयभंग करुन मारहाण केली. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपीच्या शोधात व्यस्त आहेत.
दरम्यान, विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या घटनेनंतर विद्यार्थी कॅम्पसमध्येच बेमुदत संपावर बसले. 2017 मध्ये झालेल्या विनयभंगाच्या घटनेपेक्षा ही घटना मोठी असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. कॅम्पसमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
पोलिसात (Police) दिलेल्या तक्रारीत विद्यार्थिनीने सांगितले की, आरोपीने तिचे कपडे काढले आणि तिचे चुंबन घेतले. तिने पुढे सांगितले की, जेव्हा मी माझे वसतिगृह सोडले आणि गांधी स्मृती वसतिगृह चौकाजवळ पोहोचले तेव्हा मला माझा मित्र तिथे दिसला.
मग आम्ही दोघे एकत्र चालायला लागलो. तेवढ्यातच तिघे दुचाकीस्वार तिथे आले. त्यांनी पहिल्यांदा माझे तोंड दाबले आणि मला कोपऱ्यात नेले. यानंतर त्यांनी मला किस केले आणि माझे सर्व कपडे काढून व्हिडिओ बनवला.
आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. यावेळी आरोपींनी माझा फोन नंबरही घेतला. मात्र, 10-15 मिनिटे ओलीस ठेवल्यानंतर त्यांनी मला सोडले, असे विद्यार्थिनीने सांगितले.
एफआयआरमध्ये (FIR) विद्यार्थिनीने आरोपींची ओळखही उघड केली आहे. विद्यार्थिनीने सांगितले की, तेथून बाहेर पडल्यानंतर ती घाबरली आणि थेट प्राध्यापकांच्या निवासस्थानी पोहोचली. तिथे सुमारे 20 मिनिटे थांबले.
यानंतर प्राध्यापकांना मी वसतिगृहात सोडण्याची विनंती केली. या प्रकरणी पोलीस आरोपींच्या शोधात व्यस्त असल्याचे सांगितले. यासाठी ते सीसीटीव्ही स्कॅन करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.