Expert Opinion on PresVu Eye Drop: भारतीय औषध उत्पादक कंपनी Entod Pharmaceuticals ने असा आय ड्रॉप बनवल्याचा दावा केला आहे, जो टाकल्यानंतर प्रिस्बायोपियाचे रुग्ण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतील आणि डोळ्यांवरील चष्मा कित्येक तास काढू शकतील. PresVu Eye Drop असे या ड्रॉपचे नाव आहे. या आय ड्रॉपला भारताच्या औषध नियंत्रक जनरल (DGCI) चीही मान्यता मिळाली आहे. मात्र, या ड्रॉपबाबत डॉक्टरांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या ड्रॉपमुळे ना चष्मा कायमचा काढता येतो आणि ना तो आत्ता सुरक्षित मानला जाऊ शकतो.
सर गंगाराम हॉस्पिटलचे (नवी दिल्ली) ऑप्थेल्मोलॉजी डिपार्टमेंटचे असोसीएटस कंसल्टेंट डॉ. तुषार ग्रोवर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, जगात असा एकही आय ड्रॉप तयार झालेला नाही, जो डोळ्यांवरील चष्मा कायमचा काढू शकेल. सध्या ज्या आय ड्रॉपची चर्चा होत आहे पाइलोकार्पिन ड्रॉप आहे. या ड्रॉपमध्ये पाइलोकार्पिनला लोअर कंसंट्रेशनमध्ये तयार करण्यात आले आहे. दरम्यान, पाइलोकार्पिन ड्रॉपचा अनेक दशकांपासून ग्लूकोमाच्या उपचारांमध्ये केला जात आहेत. हा ड्रॉप टाकल्याने काही तास लोक स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.
डॉक्टर तुषार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पाइलोकार्पिनचे ड्रॉप डोळ्यात टाकले जातात तेव्हा डोळ्याची बाहुली सुमारे 6 तास लहान होते, ज्यामुळे रेज सरळ रेटिनावर पडू लागतात आणि लोकांना जवळच्या आणि दूरच्या गोष्टी स्पष्ट दिसतात. याला 'पिन होल इफेक्ट' म्हणतात. जे लोक चष्म्याला पर्याय म्हणून याकडे पाहत आहेत, त्यांना हे समजून घ्यावे लागले की, चष्मा लावू नये म्हणून हा ड्रॉप दर 6 तासांनी डोळ्यात टाकावा लागेल. या ड्रॉपच्या अतिवापराने डोळ्यांवर काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. यामुळे डोकेदुखी, अंधुक दृष्टी, डिसकंफर्ट आणि इरिटेशन होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, काही मेडिकल रिपोर्टच्या आधारे असे म्हणता येईल की या आय ड्रॉपचा दीर्घकाळ वापर केल्याने रेटिनल डिटॅचमेंटचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत लोकांची दृष्टी कमी होते. चष्मा हा डोळ्यांसाठी कायमस्वरुपी आणि सुरक्षित उपाय आहे, तर असे आय ड्रॉप प्रत्येकाच्या डोळ्यांसाठी सुरक्षित मानले जाऊ शकत नाहीत. ज्या लोकांना या आय ड्रॉपचे कोणतेही दुष्परिणाम दिसत नाहीत ते हा ड्रॉप वापरु शकतात. हा ड्रॉप डोळ्यांसाठी कितपत सुरक्षित असेल हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. यासाठी संशोधनाची गरज आहे. काही कालावधीनंतर या ड्रॉपची सुरक्षितता लक्षात येईल.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मायोपियाच्या बाबतीत म्हणजे लहान मुलांना दूरच्या वस्तू दिसू न लागल्यास ॲट्रोपिन आय ड्रॉप्स दिला जातो जो मायोपिया प्रोगेसन थांबवण्यास मदत करतो परंतु हा ड्रॉप देखील चष्म्याची पॉवर काढू शकत नाहीत. एकंदरीत असे म्हणता येईल की, डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा ड्रॉप टाकून चष्मा काढण्याचा प्रयत्न करु नये, कारण असा एकही ड्रॉप अद्याप तयार झालेला नाहीये. लोकांनी टेंपररी गोष्टींऐवजी चष्मा वापरावा कारण चष्मा डोळ्यांसाठी सुरक्षित आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.