चार महिला हवालदारांना व्हायचंय 'पुरुष', जेंडर बदलण्यासाठी डीजी कार्यालयाकडे अर्ज!

Uttar Pradesh Police: राजेशपासून सोनिया बनलेल्या तरुणाची गोष्ट तुम्हाला आठवत असेल. त्याच धर्तीवर आता यूपीच्या चार महिला कॉन्स्टेबल्सना जेंडर बदलायचे आहे.
Uttar Pradesh Police
Uttar Pradesh PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh Police: राजेशपासून सोनिया बनलेल्या तरुणाची गोष्ट तुम्हाला आठवत असेल. त्याच धर्तीवर आता यूपीच्या चार महिला कॉन्स्टेबल्सना जेंडर बदलायचे आहे.

या महिला कॉन्स्टेबल्सनी पुरुष होण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी डीजी कार्यालयाकडे अर्ज केला आहे. महिला कॉन्स्टेबलचा हा अर्ज वाचून पोलीस खातेही चक्रावून गेले आहे.

एवढेच नाही तर एका महिला कॉन्स्टेबलने जेंडर बदलण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महिला कॉन्स्टेबलच्या अर्जावरही उच्च न्यायालयाने घटनात्मक अधिकार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, गोरखपूर, गोंडा, सीतापूर आणि अयोध्या (Ayodhya) येथे तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबलने पुरुष बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चारही जिल्ह्य़ांमध्ये तैनात असलेल्या महिलांनीही जेंडर बदलण्याची परवानगी मिळावी यासाठी डीजी कार्यालयाकडे अर्ज केला आहे.

या महिलांची याचिका जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. महिला कॉन्स्टेबलच्या अर्जाची दखल घेत डीजी कार्यालयाच्या वतीने चार जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून त्यांचे समुपदेशन करण्यास सांगितले आहे.

Uttar Pradesh Police
Uttar Pradesh Crime: विवस्त्र करुन तरुणाला बेदम मारहाण, तो विनवणी करत राहिला...

दुसरीकडे, गोरखपूर जिल्ह्यातील एलआययूमध्ये तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने सांगितले की, तिने डीजी ऑफिसमध्ये अर्ज दिला आहे. मला देखील बोलावले गेले आहे आणि मला जेंडर डिसफोरिया आहे का ते विचारले गेले आहे.

त्याचे प्रमाणपत्रही अर्जात जोडण्यात आले आहे. महिला कॉन्स्टेबलने सांगितले की, लखनऊ मुख्यालयातून अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही. सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास जेंडर बदलासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे महिला कॉन्स्टेबलने सांगितले.

जेंडर बदलण्यासाठी फेब्रुवारीपासून...

अयोध्येत राहणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 2019 मध्ये तिची यूपी पोलिसमध्ये निवड झाली होती. तिची पहिली पोस्टिंग गोरखपूर होती. ती जेंडर बदलण्यासाठी ती फेब्रुवारीपासून प्रयत्न करत आहे.

तिने पुढे सांगितले की, गोरखपूरमध्ये ती एसएसपी, एडीजी आणि नंतर डीजी मुख्यालयात गेली आहे. पुरुष बनण्याच्या प्रश्नावर महिला कॉन्स्टेबलने सांगितले की, अभ्यासादरम्यान तिचे हार्मोन्स बदलू लागले. यानंतर तिला जेंडर बदलण्याची इच्छा होऊ लागली.

तिने पुढे सांगितले की, यासाठी सर्वप्रथम तिने दिल्लीतील एका मोठ्या डॉक्टरकडून अनेक टप्प्यांत समुपदेशन करुन घेतले.

तपासणीनंतर डॉक्टरांनी (Doctors) तिला 'जेंडर डिसफोरिया' असल्याचे निदान केले. डॉक्टरांच्या अहवालाच्या आधारे तिने जेंडर बदलाची परवानगी मागितली आहे.

Uttar Pradesh Police
Uttar Pradesh Crime: माणूस म्हणावे की हैवान! प्रेमविवाह केलेल्या पत्नी आणि आठ महिन्याच्या मुलीची कुऱ्हाडीने केली हत्या

मुलीसारखे वागणे विचित्र वाटते

अयोध्येतील रहिवासी असलेल्या महिला कॉन्स्टेबलने सांगितले की, तिचे वागणे पुरुषासारखे आहे. पुरुषांप्रमाणे ती कपडे परिधान करते. बाइक चालवते. पँट आणि शर्ट घालून ऑफिसला जाते.

ती सांगते की, जेव्हा ती शाळेत गेली तेव्हा तिला मुलीसारखे काम करणे विचित्र वाटत होते. शाळेत तिच्या वागण्यामुळे बरेच लोक तिला मुलगा म्हणायचे, जे तिला खूप आवडायचे.

Uttar Pradesh Police
Uttar Pradesh Crime: 'साहेब न्याय करा...', पोलिसांच्या कारवाईला कंटाळून बलात्कार पीडितेची आत्महत्या

उच्च न्यायालयाने महिला कॉन्स्टेबलच्या बाजूने निकाल दिला होता

अयोध्येतील महिला कॉन्स्टेबलप्रमाणेच सीतापूर, गोंडा आणि गोरखपूरच्या महिला कॉन्स्टेबल्सना जेंडर बदलायचे आहे. जेंडर बदलासाठी उच्च न्यायालयातही जाणार असल्याचे तिन्ही महिला कॉन्स्टेबल्स सांगितले आहे.

वास्तविक, अयोध्येतील महिला कॉन्स्टेबलने उच्च न्यायालयात जेंडर बदलासाठी अर्ज केला होता, त्यावर उच्च न्यायालयाने महिला कॉन्स्टेबलच्या बाजूने निकाल दिला होता. जेंडर बदलणे हा घटनात्मक अधिकार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते.

जर आधुनिक समाज एखाद्या व्यक्तीची ओळख बदलण्याचा अधिकार नाकारत असेल किंवा स्वीकारत नसेल तर आम्ही फक्त जेंडर ओळख विकार सिंड्रोमला प्रोत्साहन देऊ. महिला कॉन्स्टेबलचा अर्ज निकाली काढण्याचे निर्देशही हायकोर्टाने यूपी डीजीपीला दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com