Gandhi Jayanti दिवशी Kashmir ला मिळणार मोठी भेट, 2019 पासून सुरू आहे काम

स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाची लहर
Gandhi Jayanti दिवशी Kashmir ला मिळणार मोठी भेट, 2019 पासून सुरू आहे काम

गांधी जयंतीनिमित्त भारतीय रेल्वे काश्मीरला (Indian Railway) एक मोठी भेट देणार आहे. यामुळे काश्मीरमधील (Kashmir) लोकांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सोपस्कर होणार आहे. इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या अधिकार्‍यांच्या मते, काश्मीर व्हॅली 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला आणखी एक मैलाचा दगड पार करेल, जेव्हा जम्मू आणि काश्मीरची पहिली इलेक्ट्रिक ट्रेन (Electric Train) 137 किमी लांबीच्या बनिहाल-बारामुल्ला कॉरिडॉरवर धावण्यास सज्ज होईल.

जम्मू आणि काश्मीर सरकार, भारतीय रेल्वे आणि इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन लिमिटेड ऑगस्ट 2019 पासून या प्रकल्पावर एकत्र काम करत आहेत. 26 सप्टेंबर रोजी या प्रकल्पाची पाहणी करण्यात येणार असून 02 ऑक्टोबर रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पासाठी 324 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात आला आहे. बडगाम-बारामुल्ला विभाग आधीच पूर्ण झाला आहे, तर बडगाम-बनिहाल कॉरिडॉरची पाहणी आणि 26 सप्टेंबर रोजी उद्घाटन केले जाईल.

Gandhi Jayanti दिवशी Kashmir ला मिळणार मोठी भेट, 2019 पासून सुरू आहे काम
T-20 World Cup मध्ये विराट करणार ओपनिंग? रोहितने दिले धक्कादायक उत्तर

बारामुल्ला ते बनिहालपर्यंत हजारो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. काश्मीर खोऱ्याला जम्मू आणि संपूर्ण देशाशी रेल्वेने जोडण्याचे कामही वेगाने सुरू आहे. आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आश्वासन दिले आहे की काश्मीर खोऱ्याशी रेल्वे कनेक्टिव्हिटी 2024 पूर्वी लोकांसाठी खुली केली जाईल.

जम्मू-काश्मीरला इतर विकसित राज्यांच्या श्रेणीत सामील होण्यास हा प्रकल्प मदत करेल. काश्मीरला 2013 मध्ये पहिली रेल्वे सेवा मिळाली, जेव्हा तिचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com