Swatantra Dev Singh: 'खा, प्या, मजा करा...', कॅबिनेट मंत्री स्वतंत्र देव यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Swatantra Dev Singh: योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वतंत्र देव सिंह यांनी सिंधी कॉलनी, शास्त्रीनगर येथे ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेतली.
Swatantra Dev Singh
Swatantra Dev SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Swatantra Dev Singh: योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वतंत्र देव सिंह यांनी सिंधी कॉलनी, शास्त्रीनगर येथे ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेतली. खा, प्या, मजा करा, बाकीचे पीएम मोदी आणि सीएम योगींवर सोडा, असे कॅबिनेट मंत्री सिंह यावेळी बैठकीदरम्यान म्हणाले.

सिंधी समाज हा भाजप परिवाराचा एक भाग आहे. आता ट्रिपल इंजिन सरकार बनवण्याची जबाबदारी तुमची आहे.

भाजप (BJP) कानपूर-बुंदेलखंडचे सह-कोषाध्यक्ष आनंद राजपाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वतंत्र देव यांनी ज्येष्ठांना मुलांना शिकवण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, 'आई-वडिलांची सेवा करा, मात्र मजुरांना शिव्या देऊ नका. ज्यूस पिऊन शरीर मजबूत आणि निरोगी बनवा, बाकीचे PM आणि CM वर सोडा. युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या मुलांना पंतप्रधानांनी सुरक्षितरित्या देशात कसे परत आणले ते तुम्हाला माहित आहे.

तर माफियांना मुख्यमंत्र्यांनी एवढा लगाम घातला की, लेकी-सूना सुरक्षित तर आहेतच, पण त्या रस्त्यावर बेधडक फिरत आहेत,' असेही स्वतंत्र देव म्हणाले.

यावेळी आमदार सुरेंद्र मैथनी, हरीश मत्रेजा, रामदास माखिजा, हिरालाल खत्री, लाल आरती लाल चांदणी, घनश्याम छाबरा आणि संजीव उर्फ ​​बाबी पाठक यांच्यासह अनेक लोक होते.

Swatantra Dev Singh
Uttar Pradesh: योगी सरकारची मोठी कारवाई, 1,332 कर्मचार्‍यांना कामावरुन टाकले काढून!

स्वतंत्र देव दर्शन करुन क्षेत्र संघ चालकाच्या घरी पोहोचले

दोन दिवसांपासून शहरात मुक्कामी असलेले जलशक्ती मंत्री स्वतंत्र देव सिंह यांनी शनिवारी परमट मंदिरात जाऊन आपल्या दिनचर्येला सुरुवात केली. तेथून निघाल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांसह थेट संघचालक वीरेंद्र जीत सिंग यांचे निवासस्थान गाठले.

शिक्षणतज्ज्ञ नीतू सिंग यांच्याशी अनेक मुद्यांवर चर्चा केली. सुमारे अर्धा तास चर्चेनंतर ते तेथून निघून गेले. मणिकांत जैन, भाजपचे नगरसेवक यशपाल, गिरजेश, श्रीकृष्ण दीक्षित यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com