Trust of the Nation 2024 Survey: पुन्हा मोदी सरकार! भाजप विजयी होणार, 63 टक्के लोकांचा विश्वास

Trust of the Nation 2024 Survey: डेलीहंटच्या सर्वेक्षणानुसार 61 टक्के लोकांनी केंद्र सरकारबाबत समाधान व्यक्त केले आहे.
PM Modi
PM Modi Dainik Gomantak

Trust of the Nation 2024 Survey

भारतातील प्रसिद्ध स्थानिक कंटेट प्लॅटफॉर्म डेलीहंटने 'ट्रस्ट ऑफ द नेशन 2024' च्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. इंग्रजी, हिंदी यासह 11 प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये घेतलेल्या या ऑनलाइन सर्वेक्षणात 77 लाखांहून अधिक लोकांनी त्यांची मते नोंदवली आहेत.

डेलीहंटच्या सर्वेक्षणानुसार 61 टक्के लोकांनी केंद्र सरकारबाबत समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणातून 63 टक्के लोकांनी देशात पुन्हा भाजप/ एनडीए प्रचंड मतांनी विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

सर्वेक्षणातील महत्वाचे मुद्दे

मत नोंदवलेल्या 64 टक्के लोकांना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे वाटते तर, 21.8 टक्के लोकांनी राहुल गांधींना पसंती दिली आहे.

तीन पैकी दोन लोकांना (63%) देशात पुन्हा भाजप सरकार अस्तित्वात येईल असे वाटते.

दिल्लीत पंतप्रधान मोदींना 57.7% , राहुल गांधींना 24.2% तर योगी आदित्यनाथ यांना 13.7% मते मिळालीयेत. तसेच, उत्तर प्रदेशमध्ये मोदींना 78.2% आणि राहुल गांधींना 10% मते मिळाली आहेत. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये मोदी 62.6%, गांधी 19.6% आणि ममता बॅनर्जींना 14.8%. मते मिळाली आहेत.

PM Modi
RG इंडिया आघाडीचा भाग का नाही? वेळीतून आरजीच्या कार्यकर्त्यांना ग्रामस्थांनी हकलले

दक्षिणेतील राज्यात तमिळनाडूमध्ये राहुल गांधींना सर्वाधिक 44.1% मते मिळाली असून, मोदींना 43.2% मते मिळाली आहेत. तसेच केरळमध्ये दोघांना जवळपास एकसारखी (40 टक्के) मते मिळाली आहेत.

तसेच, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये देखील मोदींनाच अधिक मते मिळाली असून, राहुल गांधी पिछाडीवर असल्याचे दिसून येते.

केंद्र सरकारच्या प्रशासकीय कागिरीबाबत 61 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर, 21 टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत 60 टक्के लोक आनंदी असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. पूर्व, पश्चिम आणि उत्तर भारतातील 63 टक्के नागरिकांनी देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले आहे. तर, दक्षिणेत 55 टक्के लोक समाधानी आहेत.

केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाबाबत 64 टक्के लोकांनी अतिशय उत्तम असा शेरा दिला आहे. 14.5 टक्के लोकांनी ते आणखी चांगले होऊ शकले असते असे मत नोंदवले आहे.

केंद्र सरकार राष्ट्रीय आपदा नियोजनात चांगले असल्याचे मत 63.6 टक्के लोकांनी नोंदवले आहे. तर, कल्याणकारी उपक्रम राबविण्याबाबत सरकारप्रती 53.8 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com