PM Modi: प्रोजेक्ट टायगर ला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकमधील बंदीपूर नॅशनल पार्क आणि मुदुमलाई नॅशनल पार्कला भेट दिली आहे. या जंगलसफारीसाठी नरेंद्र मोदींनी केलेल्या खास लूकची चर्चा सगळीकडे होत असतानाच कॉग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
कॉग्रेसनेता जयराम रमेश यांनी ट्विट करत लिहले आहे की, 50 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या प्रोजेक्ट टायगरचे पूर्ण क्रेडिट घेतील. आदिवासी, पर्यावरण, जंगल, वन्य जीव आणि इतर क्षेत्रासाठी असलेले सगळे कायदे उद्धवस्त केले जातील. ते कितीही बढाया मारु देत पण सत्य वेगळे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, कर्नाटक कॉग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुनदेखील हल्लाबोल केला आहे. कॉग्रेसने 70 वर्षात काय केले आहे. तो हाच प्रोजेक्ट टायगर आहे जो 1973 ला सुरुवात केला होता. हीच कॉग्रेस सरकार होती जिने 1973 ला बंदीपूर नॅशनल पार्कला वाघ संरक्षण परियोजना लागू केली होती.
ज्यामध्ये तुम्ही सफारीचा आनंद घेत आहात. आज वाघांची वाढलेली संख्या हा त्यावेळी केलेल्या सुरु केलेल्या प्रोजेक्टचा टायगर परिणाम आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की, बंदीपूरला आता अदानीला विकू नका.
दरम्यान, पंतप्रधान मोदी 'अमृत काल' दरम्यान व्याघ्र संवर्धनासाठी सरकारचे व्हिजन देखील प्रसिद्ध करतील आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स (IBCA) देखील लॉन्च करतील. IBCA जगातील सात मोठ्या मांजरींच्या संवर्धन आणि संरक्षणावर लक्ष केंद्रित करेल - वाघ, सिंह, बिबट्या, स्नो लेपर्ड, प्यूमा, जग्वार आणि चित्ता यांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.