Odisha: ओडिशाच्या पॅराद्वीप बंदरात 220 कोटी रुपयांचे कोकेन जप्त!

Largest Consignment Of Drugs Seized In Odisha: ओडिशामध्ये ड्रग्जची सर्वात मोठी खेप जप्त करण्यात आली आहे.
Largest Consignment Of Drugs Seized In Odisha
Largest Consignment Of Drugs Seized In OdishaDainik Gomantak
Published on
Updated on

Largest Consignment Of Drugs Seized In Odisha: ओडिशामध्ये ड्रग्जची सर्वात मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. जगतसिंगपूर जिल्ह्यातील पॅराद्वीप बंदरात एका कंटेनर जहाजातून सीमाशुल्क अधिकार्‍यांनी शुक्रवारी 22 किलो कोकेन जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे 220 कोटी रुपये किंमत आहे. सीमाशुल्क सूत्रांनी सांगितले की, मालवाहू जहाज गुरुवारी रात्री इंडोनेशियाहून पॅराद्वीप इथे पोहोचले आणि ते डेन्मार्कला रवाना होणार होते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुरुवार आणि शुक्रवारी मध्यरात्री भुवनेश्वरमधील सीमाशुल्क विभागाला या जहाजातून ड्रग्जची तस्करी होत असल्याची गुप्तचर माहिती मिळाली. सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, “आम्ही पॅराद्वीपला पोहोचलो, जहाज थांबवले आणि शोध मोहीम राबवली. जहाजावरील क्रेनच्या वरच्या भागावर किमान 22 पॉलिथिनने झाकलेले पॅकेट सापडले, जे डेकवरुन स्पष्टपणे दिसत नव्हते. पाकिटे जप्त केल्यानंतर त्यामध्ये सुमारे 22 किलो उच्च दर्जाचे कोकेन आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो कोकेनची किंमत किमान 10 कोटी रुपये आहे.''

Largest Consignment Of Drugs Seized In Odisha
Odisha Train Accident: बालासोर दुर्घटनेप्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

दरम्यान, अद्याप तस्कराचा शोध घेण्यात एजन्सीला यश आलेले नाही. जहाजात सुमारे 25 क्रू मेंबर आहेत. ते म्हणाले की, “आम्हाला ठाम संशय आहे की क्रू सदस्यांपैकी एकाने या ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न केला असावा. हे जहाज इतर कोणत्याही भारतीय बंदरावर थांबण्याचे ठरले नव्हते, त्यामुळे ही खेप परदेशातून पोचली असावी असा आम्हाला संशय आहे. हे ड्रग्ज भारतीय बाजारपेठेत पुरवण्यासाठी नव्हते असे दिसते.'' सीमाशुल्क विभागाने ओडिशा पोलिसांच्या स्निफर डॉगच्या मदतीने शोध सुरु केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व क्रू मेंबर्सची चौकशी केली जाईल आणि त्यांना त्वरित देश सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Largest Consignment Of Drugs Seized In Odisha
Odisha Train Accident: सिग्नल इंजीनिअर कुटुंबसह खरंच बेपत्ता झाला आहे का? रेल्वे अधिकारी म्हणतात...

दुसरीकडे, पोलीस, उत्पादन शुल्क, सीमाशुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालय यासारख्या विविध एजन्सी राज्यात नियमित अंतराने ब्राऊन शुगर आणि गांजा जप्त करत आहेत. 13 एप्रिल 2022 रोजी, ओडिशात प्रथमच, राज्य गुन्हे शाखेच्या विशेष टास्क फोर्सने (STF) भुवनेश्वरमधील झेवियर स्क्वेअरजवळ राजस्थानमधील दोन तस्करांकडून सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 202 ग्रॅम कोकेन जप्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com