Bank Fraud Noida Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये बँक फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका असिस्टंट बँक मॅनेजरने एका खासगी कंपनीच्या खात्यातून 28 कोटी रुपये त्याच्या कुटुंबाच्या खात्यात ट्रान्सफर केले. हे पैसे त्याने पत्नी आणि आईच्या खात्यात ट्रान्सफर केले. वृत्तानुसार, पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तो आणि त्याचे कुटुंबीय फरार झाले. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेचे असिस्टंट मॅनेजर राहुल शर्मा आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ते साऊथ इंडियन बँकेत असिस्टंट बँक मॅनेजरने होते. ते देश सोडून परदेशात पळून गेले असल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.
दरम्यान, साऊथ इंडियन बँक लिमिटेडचे डीजीएम रणजीत आर नायक यांनी या संदर्भात नोएडामधील सेक्टर-24 पोलीस ठाण्यात 18 डिसेंबर रोजी एफआयआर दाखल केला होता. बँकेचे असिस्टंट मॅनेजर राहुल शर्मा, त्यांची पत्नी भूमिका शर्मा आणि आई सीमा आणि इतरांविरुद्ध आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पैसे 20 पेक्षा जास्त वेळा ट्रान्सफर केले गेले.
दुसरीकडे, बँकेच्या अधिकाऱ्यांना अनियमिततेची तक्रार आल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले आहेत, त्याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी पुढील कारवाई सुरु असून लवकरच आरोपींना पकडून चौकशी केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये खात्यांची माहिती देण्यात आली असून ते लवकरात लवकर गोठवण्यात यावेत, असे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.