Viral Video: 'मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करु न शकल्याने...', आंध्र प्रदेशातील नगरसेवकाचा व्हिडिओ व्हायरल

Andhra Pradesh News: सोशल मीडियावर आंध्र प्रदेशातील एका नगरसेवकाचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या गालावर चप्पल मारताना दिसत आहे.
Mulaparthi Ramraju
Mulaparthi RamrajuDainik Gomantak
Published on
Updated on

Andhra Pradesh News: सोशल मीडियावर आंध्र प्रदेशातील एका नगरसेवकाचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या गालावर चप्पल मारताना दिसत आहे. मते मागताना नगरसेवकाने जनतेला अनेक आश्वासने दिल्याचे बोलले जात आहे.

मात्र, या आश्वासनांची पूर्तता न केल्याने तो स्वतःवरच नाराज असल्याचे बोलले जात होते. यामुळे तो स्वत:ला चप्पलने मारत होता. मुलापार्थी रामराजू असे या नगरसेवकाचे नाव असून ते प्रभाग क्रमांक 20 मधून निवडून आले आहेत. कौन्सिलच्या बैठकीत हा प्रकार घडला.

दरम्यान, रामराजू म्हणाले की, मला नगरसेवक होऊन 31 महिने झाले आहेत. पण मला माझ्या भागात कोणतेही काम करता आले नाही. ते पुढे म्हणाले की, माझ्या परिसरात ड्रेनेज, वीज, स्वच्छता, रस्ता आदी समस्या अजूनही कायम आहेत.

या कारणांमुळे मी स्वत:ला चप्पलने मारत असल्याचे रामराजू म्हणाले. हा 40 वर्षीय नगरसेवक ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतो. ते पुढे म्हणाले की, मी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात आतापर्यंत अपयश आले आहे.

दुसरीकडे, प्रभाग क्रमांक 20 कडे स्थानिक पालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी रासराजू यांनी केला. आपल्या एकाही मतदाराला पाण्याचे कनेक्शन मिळालेले नाही, असे ते म्हणाले. सभेत नगरसेवक रामराजू भावूक झाले.

जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करण्यापेक्षा मरण बरे, असे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Election) टीडीपीने रामराजू यांना पाठिंबा दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com