डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला जाण्याची गरज नाही? आनंद महिंद्रा घेणार पुढाकर

Russia-Ukraine War : महिंद्रा विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी संस्था स्थापन करण्याचा विचार
Anand Mahindra
Anand Mahindradainikgomantak
Published on
Updated on

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्धाने जगासमोर मोठा प्रश्न निर्माण केला असून जगातील अनेक देशांनी रशियाचा निषेध केला आहे. तर या युद्धामुळे भारताचेही उच्च शैक्षणिक धोरणावर ही जनतेसमोर आल्याने समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने आपली मुलं युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी का जातात? आपल्याकडे तसे उच्च शिक्षण नाही का? या प्रश्नांची भर आहे. यावर आता उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पुढाकर घेतला असून, 'महिंद्रा विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी संस्था स्थापन करण्याचा विचार करू शकतो का?' अशी विचारना टेक महिंद्राचे (Tech Mahindra) एमडी आणि सीईओ, सी. पी. गुरनानी यांना केली आहे. त्यांनी ही विचारना ट्विटरवरच्या माध्यमातून केली आहे.

सध्या रशिया-युक्रेनमधील युद्धाने सगळ्यांनाच समाजमाध्यमां जवळ आणले आहे. तर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे ट्विटरवर (Twitter) नव्या माहितीची देवाण-घेवाण करत असताना अनेक मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलताना दिसत आहेत. यावेळी त्यांना युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची, विशेषत: वैद्यकीय विद्यार्थ्यांची स्थितीचे (Indian Medical Student Stranded In Ukraine) कारण समजले आहे. त्यावर आता उपाय शोधण्याचे महिंद्रा यांनी ठरवले आहे.

यावेळी महिंद्रा यांनी ट्विट करून सांगितले की, भारतात वैद्यकीय महाविद्यालयांची (medical colleges) इतकी कमतरता आहे, हे मला माहीत नव्हते. त्यावर त्यांनी, टेक महिंद्राचे (Tech Mahindra) एमडी आणि सीईओ, सी. पी. गुरनानी यांना टॅग करत, 'महिंद्रा विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी संस्था स्थापन करण्याचा विचार करू शकतो का?' अशी विचारना केली आहे.

तसेच त्यांच्या या ट्विटनंतर त्यांना अनेक नेटकऱ्यांनी रिप्लाय देत, भारतातून मोठ्या संख्येने मुले वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये केवळ जागांच्या कमतरतेमुळे जात नसून आपल्याकडील अव्याढव्य खर्चामुळे जात आहेत. तर इतर संस्थांप्रमाणे कोट्यावधी फी तुमच्या संस्थेने घेऊ नये अशी अपेक्षा एका युजरने आनंद महिंद्रा सांगितली. त्यावर आनंद महिंद्रा यांनी, मी काळजी घेईन असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com