Afzal Ansari Convicted: गँगस्टर प्रकरणात मुख्तारपाठोपाठ अफजल अन्सारीही दोषी, चार वर्षांची शिक्षा; खासदारकी जाणार

Gangster Act: गाझीपूरच्या एमपी/एमएलए न्यायालयाने अनुक्रमे 10 वर्षे आणि 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Afzal Ansari
Afzal AnsariDainik Gomantak
Published on
Updated on

Afzal Ansari-Mukhtar Ansari: भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येनंतर गँगस्टर कायद्यांतर्गत आरोपी असलेले माजी आमदार मुख्तार अन्सारी आणि त्यांचा भाऊ बसपा खासदार अफजल अन्सारी यांना गाझीपूरच्या एमपी/एमएलए न्यायालयाने अनुक्रमे 10 वर्षे आणि 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

त्यामुळे अफझल यांची खासदारकी संपुष्टात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अफजल अन्सारी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार मनोज सिन्हा (सध्या जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर) यांचा पराभव करुन विजय मिळवला होता.

दरम्यान, अन्सारी बंधूंच्या शिक्षेवर कृष्णानंद राय यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. एका वाहिनीशी बोलताना कृष्णानंद राय यांचे पुत्र पीयूष म्हणाले की, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या कठोर निर्णयाचा आणि गुन्हेगारीबाबतच्या झिरो टॉलरन्स धोरणाचा हा पुरावा आहे.'

Afzal Ansari
Mukhtar Ansari: माफिया मुख्तार अन्सारीला न्यायालयाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा, 5 लाखांचा दंड!

दुसरीकडे, शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा खासदार अफजल अन्सारी कोर्टात हजर होते. तर माजी आमदार मुख्तार अन्सारीने बांदा कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.

खासदार अफजल आणि मुख्तार यांच्यावरील आगामी निकालाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिक्षा सुनावल्यानंतर गाझीपूरचे डीएम आणि एसएसपीही घटनास्थळी पोहोचले.

अफजल कैद्यांच्या वाहनातून जिल्हा कारागृहाकडे रवाना झाले

शिक्षा सुनावल्यानंतर काही वेळातच खासदार अफजल अन्सारी यांना कैद्यांच्या वाहनातून गाझीपूर जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले.

अन्सारीची तुरुंगातील सुरक्षा आणि त्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांबद्दल विचारले असता, डीएम आणि एसएसपी म्हणाले की, जेल अधीक्षक यासंदर्भात जेल मॅन्युअलनुसार व्यवस्था करतील.

Afzal Ansari
ED Raid On Mukhtar Ansari: मुख्तार अन्सारीच्या घरावर EDचे छापे, दिल्ली-यूपीसह 11 ठिकाणी कारवाई सुरू

आमदारकी गमावल्यानंतर राय यांची हत्या झाली होती

29 नोव्हेंबर 2005 रोजी गाझीपूरमध्ये मोहम्मदाबादमधील भाजपचे तत्कालीन आमदार कृष्णानंद राय यांच्यासह एकूण 7 जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

निवडणुकीच्या (Election) वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली. या खून प्रकरणात मुख्तार अन्सारी आणि अफजल यांना आरोपी बनवण्यात आले होते.

खरे तर, 2002 मध्ये अन्सारी बंधूंचे वर्चस्व असलेल्या मोहम्मदाबाद विधानसभेच्या जागेवर कृष्णानंद राय यांनी अफजल अन्सारी यांचा पराभव करुन विजय मिळवला होता. यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com