अंधारात हरवलेल्या संगीत तारका

खरंतर शास्त्रीय संगीताचे संवर्धन करण्याचे महान काम या स्त्रियांनी केले. त्याकाळी गोव्यात अशा स्त्रियांना फारसा मानमरातब मिळत नसे.
Saraswatibai Bandodkar
Saraswatibai BandodkarDainik Gomantak
Published on
Updated on

आसावरी कुलकर्णी

गोव्याच्या मातीत संगीत आहे, नाट्य आहे असे आपण नेहमीच वाचतो. भजन, कीर्तन, नाट्य परंपरेतून प्रत्यक्ष अनुभवतो.

गोमंतकीय संगीताचा विषय आला की आपण अभिमानाने मंगेशकर कुटुंबियांचे नाव घेतो. पण प्रत्यक्षात आपल्याला माहीत आहे का, ही संगीताची परंपरा केंव्हा सुरू झाली.

पोर्तुगीज राजसत्ता असताना देखील ती कशी सांभाळली गेली? दुर्दैवाने एवढ्या महत्त्वाच्या विषयावर संशोधन करावे असे आजकालच्या एकाही कलाकाराला वाटू नये हे दुर्दैव आहे. असा अभ्यास झालाही असल्यास तशी प्रसिद्धी नाही हेही असू शकते. मागच्या काही भागात आपण काही संगीत विदूषींबद्दल वाचले असेल.

अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात गोव्यातील समृद्ध अशा शास्त्रीय गायनाच्या परंपरेला सुरुवात झाली. त्याही पूर्वी असेलही कदाचित पण तशी नोंद नाही. पण या काळात कित्येक स्त्रिया संगीत शिकत होत्या, एवढेच नव्हे तर भारतभर आपल्या मैफिली गाजवत होत्या हे फार कमी लोकांना माहीत आहे. सरस्वतीबाई बांदोडकर या पहिल्या गोमंतकीय महिला होत्या ज्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.

Saraswatibai Bandodkar
Goa AAP: का झाला कुजिरातील मुलांत वाद? आम आदमी पक्षाने सांगितले कारण

विठोबा अण्णा हडप यांनी गोव्यात येऊन गोमंतकीय स्त्री संगीत शिक्षणाचा पाया रचला असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. पं. रामकृष्ण बुवा वझे तसेच पं भास्करबुवा बखले यांनीही गोव्यातील अनेक स्त्रियांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले. सरस्वती बांदोडकर यांनी धृपद धुमार चे शिक्षण घेतले. दुर्दैवाने यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

आजचे आघाडीचे गायक श्री रुपेश गावस यांनी लिहिलेल्या एका लेखातून ही माहिती मिळाली. शाणे बाई रामनाथकर आणि त्यांची कन्या, वत्सला बाई पर्वतकर, जनाबाई आणि जनाबाई मांजरेकर अश्या किती तरी स्त्रियांनी शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. खरतर शास्त्रीय संगीताचे संवर्धन करण्याचे महान काम या स्त्रियांनी केले.

त्याकाळी गोव्यात अश्या स्त्रियांना फारसा मानमरातब मिळत नसे. मोगुबाई कुर्डीकर यांनी विषद केलेला एक किस्सा तत्कालीन समाजाची परिस्थिती दर्शवतो.

कुर्पे गावात त्यांना गायनाच्या मैफिलीचे निमंत्रण आले, बिदागी फक्त पन्नास रुपये होती, परंतु गावात असल्या मुळे मोगुबाईंनी हे निमंत्रण स्वीकारले. तिथे गेल्यानंतर यजमानांनी एकेरी उल्लेख करून मोगु आली आहे त्यांना चहा द्या असे सांगून कारवंटीतून चहा दिला.

देवदासी घराण्याचा ठप्पा अजूनही आपल्यावर आहे याचे त्यांना प्रचंड दुःख झाले . या अशा घटनांतून आपल्याला लक्षात येईल की आपण या अनमोल तरकाना कशा रीतीने अंधारात लोटले. त्या वेळच्या प्रख्यात गायकांनी गोमंतकीय गायिकाबद्दल गौरवोद्गार काढले होते, की त्यांच्या गायनात वागण्यात शालीनता झळकते.

आपले दुर्दैव हे की अगदी अलीकडे पर्यंत आपल्या गोव्यातील कलाकारांना आपण अशीच वागणूक देत आलेलो आहोत. या विषयावर कुणीतरी संशोधन तरी करेल अशी आशा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com