शनी महात्म्य..

खरचं साडेसाती म्हणजे म्हणे अत्यंत वाईट, सगळ्याप्रकारचा त्रास निर्माण करणारी असते का ?
Astrology शनी महात्म्य..
Astrology शनी महात्म्य..Dainik Gomantak
Published on
Updated on

Astrology : फिरून फिरून माझे मन तुमच्याकडे येते आणि फार वाईट वाटते. वाईट अशासाठी की तुम्ही मला नको तितके घाबरता. माझ्या नावाचा तुम्ही लोकांनी अगदी धसकाच घेतला आहे. तेव्हा म्हटले आज जो काही तुमच्या मनांत माझ्याबद्दल गैरसमज आहे त्याचा काय तो सोक्षमोक्ष लावावा. माझे असे ठाम मत आहे की तुमच्याकडल्या तुमच्या त्या भविष्यकारांनी माझ्याबद्दल तुमच्या मनांत एकप्रकारची भीतीच घातली आहे. मी, शनी, एकदा का तुमच्या राशीला लागलो की तो तुमच्या मागने साडेसात वर्षे तरी जात नाही. ह्यालाच म्हणे तुच्यांत साडेसाती लागली असें म्हणतात.

Astrology शनी महात्म्य..
मला सांगा... 'यश' म्हणजे नक्की काय असतं?

आता ही साडेसाती म्हणजे म्हणे अत्यंत वाईट असते. सगळ्याप्रकारचा त्रास निर्माण करणारी असते. तुमचे आरोग्य बिघडले तर साडेसातीमुळे. व्यवहारांत खोट बसली तर ती साडेसातीमुळे. लव्ह बिव्ह प्रकरणांत प्रेमभंग (Breakup) झाला तरही माझ्याच मुळे. बरं, वर तुमच्या त्या भविष्यकारांनी (Fortune Teller) मला थोडासा मोकळा श्वास घेण्यासाठी एका जागेवर तरी कधीं ठेवला आहे का? तर तेही नाही. आज तुमच्या कुंडलीतल्या ह्या घरांत तर उद्या त्या घरांत.म्हणजे आठव्या घरांत, सातव्या घरांत वगैरे वगैरे. वर आणि मधे मधे कधी ह्याच्या मार्गांत तर कधी त्याच्या मार्गांत. म्हणजे कधीं केतू माझ्या मार्गांत येतो तर कधी मी मंगळाच्या मार्गांत जातो आणि त्याला काय तर म्हणे छेद देतो. म्हणजे मधल्या मधे आमच्यातही भांडणे लावून देण्यासारखे झाले की नाही. तेव्हां म्हटले आता फार झाले. ह्याचा सोक्षमोक्ष हा झालाच पाहिले. म्हणून हा प्रपंच.

तुम्ही मला इतके का भिता हे एकवेळ मी समजू शकतो.पण तुमचे ते भविष्यकार माझ्यामागे साडेसातीसारखे असे का लागले आहेत हेच मला कळत नाही. हें इतपत झाले की मला क्षणभर वाटले देखील की मीच तर माझ्या राशीला लागलो नाही ना? तुमच्यावर कसलेही अरिष्ट कोसळले तर त्याला मीच जबाबदार आहे असं तुम्ही सगळेच मानतात. म्हणजे तसा तुमचा गैरसमज त्या तुमच्या भविष्यकारांनी करून दिलेला आहे.

असो. लॅट अस कम तू द पॉईंट. खरंच का मी इतका वाईट्ट आहे? अहो कसं सांगू तुम्हाला म्हणजे तुम्हाला पटेल की खरंच मी तसा नाही आहे. मी ना, चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट अशा प्रकारांतला आहे. मी कधीही चांगलं वागणाऱ्यांच्या किंवा चांगलं बोलणाऱ्यांच्या वाटेला जाणारा नाही. काय बिशाद आहे माझ्या बापाची की मी तसे करेन

बापरे, खरं म्हणजे मी इथे माझ्या बापाला आणण्याचे काहीही कारण नव्हते. मला अभिमान आहे मी सूर्यपुत्र असण्याचा. कारण माझ्या बापाने इथें देवलोकांत आपल्या नावाचा एक वेगळाच दबदबा निर्माण केलेला आहे. इंद्रसभेत सूर्यदेवाने काही सांगितले की, इंद्रदेवसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करत नाही. कारण त्याचे कारणच तसें आहे. माझे वडील ज्यांना आम्ही मुलें म्हणजे मी, यमदेव, यमी, ताप्ती, तात असें म्हणतो ते अगदी स्पष्टवक्ते आहेत. खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे आहेत. आणि तेही कुणाचीही भिड न बाळगता तोंडावर.

नारद मुनीच सांगत होते, एकदां तर तातांनी प्रत्यक्ष त्रिमूर्तीनाच सांगितले होते म्हणे की त्यांचे जें काही राजकारण आहे त्यांत आम्हां देवलोकांतील उपदेवांना गुंतवू नका. ते त्यांनाच भारी पडेल. तेव्हापासून इंद्रदेवदेखील तातांना वचकून असतात.तेव्हां माझा हे सगळे सांगण्याचा मुद्दा म्हणजे अशा बापाचा मी मुलगा असल्याने मी कधीतरी तुमच्याशी कारण नसताना वावगे वागेल का? अजिबात नाही. तुम्ही जर सरळ मार्गाने व चांगले वागणारे असाल तर मी तुमच्या वाऱ्यालादेखील थंबणार नाही. उगाच घाबरू नका.

Astrology शनी महात्म्य..
Leadership हे दृष्टी, पुढाकार आणि दृढविश्वासाबद्दल असलेले एक धैर्य

दुसरें एक. तुम्ही शनिवारी माझा वार म्हणून मारुतीच्या देवळात जाता आणि मारुतीला तेल वाहता आणि त्यामुळे तुमच्यातील काही जणांना वाटते की तें तेल माझ्यापर्यंत कसे पोचेल. म्हणजे मला तें कसें मिळेल.हाही मिस कॉन्सेप्ट तुम्ही तुमच्या मनांतून काढून टाका. मारुतीरायांची तुम्ही केलेली पूजा, तुम्ही वाहिलेले तेल मला जरुर पुरते. एकदा लहान असताना मारुतीराय माझ्या तातांवर झेपावले होते म्हणे आणि त्या प्रकरणांत त्यांनी आपले तोंड पाळून घेतले होते.सूर्यदेव त्यांच्या ह्या कृतीने इतके भारावून गेले होते की त्यांनी हनुमंतांना वरच दिला होता की तो त्यांना त्यांच्या शनी ह्या मुलासारखांच असेल. तर झालं ना आता तुमचे समाधान. तर चला आजच्या आज मारुतीरायांच्या देवळांत जा आणि चांगलं तांब्याभरून तेल वाहा. आणि विसरू नका. चांगले बोला, चांगले वागा. थोडक्यांत एक व्यक्ती म्हणून चांगले व्हा. माझी धास्ती बाळगण्याची अजिबात गरज नाही. तेच तर माझे महात्म्य आहे.

प्रदीप माधव तळावलीकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com